Sunil Shelke on NCP Crisis : "2 जुलै 2023 चा शपथविधी हा अवघ्या काही तासांत झाला नाही. त्याअगोदर दोन अडिच महिने घडामोडी सुरु होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसला किती मंत्रिपद मिळणार? लोकसभा, विधानसभेच्या किती जागा मिळणार? यावर चर्चा सुरु होती. हे सर्व ठरवलं. त्यानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पवार साहेबांनी राजीनामा दिला. काही मंडळींनी साहेबांना भूमिका बदल्यास भाग पाडलं. सुप्रिया सुळेही घडामोडींमध्ये सहभागी होत्या. रोहित पवारही महायुतीत जाण्यासाठी आग्रही होते. तेच आज अजितदादांना (Ajit Pawar) चुकीचे म्हणत आहेत. पवार कुटुंबियांमध्ये देखील महायुतीमध्ये जाण्याबाबत चर्चा झाली होती. सुप्रियाताईंनी (Supriya Sule) अध्यक्ष व्हायचं, साहेबांनी राजीनामा द्यायचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीसोबत जाईल. अजितदादांना (Ajit Pawar) हे सर्व मान्य करण्यास सांगितलं होतं. आता हीच लोक आमच्यात विष पेरत आहेत", असे खळबळजनक आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी केले आहेत. ते एबीपी माझाशी बोलत होते. बारामती लोकसभेत सात मे ला मतदान होतंय. तत्पूर्वी शेळकेंनी हे खळबळजनक आरोप केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
साहेबांच्या मनामध्ये आमच्या बाबतीत विष पेरण्याचं काम जाणिवपूर्वक
सुनील शेळके म्हणाले, पवार साहेब आम्हाला काही बोलले असतील, तो त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे. परंतु साहेबांच्या मनामध्ये आमच्या बाबतीत विष पेरण्याचं काम जाणिवपूर्वक सुप्रिया सुळे आणि रोहित पवार किंवा जितेंद्र आव्हाडांसारखी मंडळी करतात. 2019 चा संपूर्ण घटनाक्रम हा देखील संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. त्यानंतर 20 जून 2022 ला एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी आपण भाजपसोबत जायला पाहिजे, ही भूमिका घेतली. पण अजितदादांनी स्पष्ट सांगितलं की पवार साहेबांनी सांगितल्या शिवाय निर्णय घ्यायचा नाही.
सुनील शेळकेंनी मांडली अजित पवारांची बाजू
बारामती लोकसभेत सात मे ला मतदान होतंय, तत्पूर्वी शेळकेंनी हे खळबळजनक आरोप केल्यानं व्यक्तआश्चर्य केलं जातंय. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे असा लढा बारामतीत सुरुये. अशावेळी महायुतीत जाण्याचा निर्णय कसा झाला आणि अजित पवारांना कसं व्हिलन ठरवलं गेलं. हे मांडताना शेळकेंनी अजित पवारांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय झाला
जे आमच्यात काही दिवसांपासून विष पेरण्याचे काम करत आहेत. त्यांना मला एवढचं सांगायचे आहे की, 2 जुलै 2023 चा शपथविधी हा अवघ्या काही तासांत झाला नाही. त्याअगोदर दोन अडिच महिने घडामोडी सुरु होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसला किती मंत्रिपद मिळणार? लोकसभा, विधानसभेच्या किती जागा मिळणार? यावर चर्चा सुरु होती. हे सर्व ठरवलं. त्यानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पवार साहेबांनी राजीनामा दिला. काही मंडळींनी साहेबांना भूमिका बदल्यास भाग पाडलं. पंरतु तीच मंडळी आज सांगत आहेत की, अजितदादांनी जे केलं ते चुकीचं केलं. त्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना मला विचारायचं आहे की, गेल्या 15 वर्षात तुम्ही बारामतीमध्ये काय विकास केला? असा सवालही सुनील शेळके यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Asaduddin Owaisi : तुमची शेवटची निवडणूक 2019 मध्येच झाली, असदुद्दीन ओवैसींचा चंद्रकांत खैरेंवर हल्लाबोल