Bajrang Sonwane meets Manoj Jarange : बजरंग सोनवणेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट, बीडचं राजकारण पलटणार?
Bajrang Sonwane meets Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची भेट घेतली.
Bajrang Sonwane meets Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची भेट घेतली. लोकसभा निवडणूक आठवड्यावर येऊन ठेपली असताना सोनवणेंनी जरांगेंची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठवाड्यात मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर पेटून उठला होता. शिवाय, भारतीय जनता पक्ष आणि मनोज जरांगे (Manoj Jarange ) यांच्यामध्ये झालेला संघर्ष सर्वश्रूत आहे. त्यामुळे सोनवणे आणि जरांगे यांच्या भेटीचा बीडच्या राजकारणावर कोणता परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीने आनंद झाला
बजरंग सोनवणे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जरांगेंच्या भेटीची माहिती दिली आहे. फेसबुक पोस्टवर सोनवणे म्हणाले, संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली. आजचा दिवस भरून पावलो. यावेळी मनोजदादांच्या प्रकृतीची विचारपूस करत हितगुज केले. या महाराष्ट्राच्या व देशाच्या इतिहासात आंदोलनाचा धगधगता इतिहास देशासमोर ठेवणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीने आनंद झाला, असं सोनवणे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.
बीडमध्ये पंकजा मुंडे वि. बजरंग सोनवणे लढत
बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना मैदानात उतरवले आहे. या मतदारसंघात मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव आहे. त्यातच सोनवणेंनी जरांगेंची भेट घेतल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. बीडमधील वंजारी आणि ओबीसी समाज पंकजा मुंडे यांच्या मागे उभा राहू शकतो, तर मराठा समाज बजरंग सोनवणेंना साथ देऊ शकतो, असं समीकरण सध्या राजकीय विश्लेषक मांडत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मराठा वि.ओबीसी असा संघर्षहा पाहायला मिळत असल्याचे बोलले जात आहे.
प्रीतम मुंडेंचं तिकीट कापलं
भाजपने प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापत, त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. प्रीतम मुंडे गेल्या 10 वर्षांपासून बीड लोकसभेचे नेतृत्व करत होत्या. मात्र, यंदा पंकजा मुंडे यांनाच मैदानात उतरवण्याच निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला. पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या परभवानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Ranjit Nimbalkar on Ranjitsinh Mohite Patil : अकलूज चौकात रणजितसिंह मोहितेंचा फुलांचा गुच्छ फडणवीस यांनी स्वीकारला नाही, गद्दारांना माफी नाही, रणजित निंबाळकरांचा हल्लाबोल