एक्स्प्लोर

Bachchu Kadu : बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...

Amravati Lok Sabha Election 2024 : बच्चू कडूंनी रितसर पैसे भरून परवानगी घेत सायन्सकोर मैदान बूक केलं होतं. पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांना मैदानावर जाण्यापासून अडवण्यात आलं.

अमरावती : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) बुधवारी अमरावती दौऱ्यावर येणार आहे. अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शाह उद्या सभा घेणार आहे. या सभास्थळावरून बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. बच्चू कडू यांनी सायन्सकोर मैदानावर सभेसाठी परवानगी घेतली असताना आता त्यांना सभास्थळी जाण्यापासून पोलिसांनी अडवलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी बच्चू कडूंना अडवलं. यानंतर बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

सभास्थळावरून बच्चू कडू आणि राणा यांच्यात वाद

बच्चू कडूंनी रितसर पैसे भरून परवानगी घेत सायन्सकोर मैदान बूक केलं होतं. पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांना मैदानावर जाण्यापासून अडवण्यात आलं. यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक होत अडवल्याचं कारण विचारत पोलिसांना प्रश्न विचारले. पोलिसांनी अमित शाहांच्या सुरक्षेचं कारण दिलं. यावरून बच्चू कडू आणि पोलिस अधिकारी यांच्या बाचाबाची झाली. पोलीस अधिकारी आणि बच्चू कडू यांच्यात नेमकं काय संभाषण झालं हे सविस्तर वाचा.

बच्चू कडू आणि पोलिसांमधील संपूर्ण संवाद

कडू - कायद्यापेक्षा माणसं मोठे नाहीत. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला ते मैदान शाहा यांच्या सभेला द्यावे लागत आहे, असे पोलीस सांगत आहेत.

पोलीस - तुम्ही माझ्यासोबत चला. सुरक्षेची काय तयारी आहे ते मी तुम्हाला दाखवतो. 

कडू - पण मैदानात सभा घेण्याची परवानगी आमच्याकडे आहे. तुम्ही पार्टीचा झेंडा लावा. तुम्ही कायद्याला तोडा. 

कडू - शिंदे साहेब मी तुमच्या पाया पडतो. (बच्चू कडू  पोलीस अधिकाऱ्याच्या पाया पडले)

पोलीस अधिकारी - तुम्हाला सभेसाठी परवानगी दिलेली आहे, हे मी मान्य करतो. 

कडू - कायद्याने परवानगी कोणाला मिळालेली आहे.

पोलीस अधिकारी- तुम्हाला

कडू- मग परवानगी रद्द कशी झाली. तुम्ही कोणाच्या अधिकारात ही परवानगी रद्द केली. तुम्हाला कायदा मान्य नाही का? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात का? तुमच्या पाय धरू का.

पोलीस अधिकारी-  साहेब तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. 

कडू - तुम्ही पोलीस अधिकारी आहात. आम्हाला कायदा शिकवू नका. तुम्ही कायदा पायदळी तुडवत आहात. तुम्ही आचारसंहितेचा भंग करत आहात. तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहात.

पोलीस अधिकारी - शांत व्हा

कडू - काय शांत व्हायचं?

पोलीस अधिकारी - साहेब शांत व्हा. मी तुम्हाला समजावून सांगतो. 

कडू - काय शांत व्हायचं. तुम्ही कायदा तोडत आहात. तुम्हाला हे गृहमंत्री सांगत आहेत का. तुम्हाला अमित शाहा कायदा तोडायचं सांगत आहात का? 

पोलीस अधिकारी - आपण यापूर्वी अनेकवेळा भेटलेलो आहोत. माझं दोन मिनिट एकूण घ्या. माझी तुम्हाला विनंती आहे, पाच मिनिट शांत व्हा. पाणी घ्या. 

बच्चू कडू - परवानगी भेटलेली असताना आम्हाला सभा का घेऊ देत नाहीत. शिंदे साहेब तुम्ही कायदा तोडत आहात. त्यांनी सभा दुसरीकडे घ्यावी. 18 तारखेला आम्ही सभेसाठी रितसर परवानगी घेतली. एका बदलीसाठी तुम्ही कायदा तोडता.

पोलीस अधिकारी - बदलीचा प्रश्न नाही साहेब. लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमचा आदर करतो.

कडू- तुम्ही काय आदर करता, रंगबाजी चालू आहे. परवानगी नसता तुम्ही त्यांच्या सभेला परवानगी कशी देता.

पोलीस अधिकारी - सुरक्षेच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामागे कोणताही राजकीय उद्देश नाही. 

कडू - आपण इथेच बसू. पाया पडतो ( असं म्हणत बच्चू कडूंनी पोलिसांपुढे लोटांगण घातलं.)

पोलीस अधिकारी - साहेब शांत व्हा.

कडू - हे कायदा तोडायचं काम तुम्हाला गृहमंत्री अमित शाह सांगत आहेत का? 

पोलीस अधिकारी - तुम्हाला परवानगी भेटली होती पण आधी ऐकून घ्या.

कडू - परवानगी आहे, मग आम्हाला सभास्थळी येऊ का देत नाही? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करता का? 

पोलीस अधिकारी - 24 तासाच्या आतमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांसाठी सुरक्षेची व्यवस्था करावी लागत आहे. त्यासाठी आम्हाला सुरक्षेसाठी हे करावं लागत आहे.

कडू - मग फक्त त्यांचीच सभा आहे का, आमची नाही का? आम्ही 18 तारखेला अर्ज देऊन रितसर परवानगी घेतली, परवानगी मिळाली. त्यांची सभा होणं जसं अनिवार्य आहे, तसं आमची सभा होणं ही अनिवार्य आहे. आता तुम्ही कायदा का मोडत आहात. बदली सुरु आहे का, तुमची एका बदलीसाठी तुम्ही कायदा मोडत आहात.

पोलीस अधिकारी - बदलीचा हा विषय नाही.

कडू - काय अडचण आहे, असं म्हणत बच्चू कडूंसह कार्यकर्ते पोलिसांच्या पाया पडले.

पोलीस अधिकारी - गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलावं लागत आहे.

कडू - एखादी परवानगी मिळाल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव ती परवानगी रद्द करता येते का?

पोलीस अधिकारी - तो त्यांच्या अधिकार आहे, आम्ही परिस्थिती कळवली आहे.

कडू - शिंदे साहेब उद्याची सभा घ्या, गळ्यात पट्टा घालून घ्या. जमवून टाकलं तु्म्ही. कायदा न पाळण्यासाठी तुम्हाला सलाम. पैसे दिले का तुम्हाला?

पोलीस अधिकारी - आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव हे करत आहोत. याचा दुसरा कोणताही हेतू नाही.
 
कडू - सुरक्षेचं कारण सांगू नका, तुम्ही गळ्यात पट्टा घाला. परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करत आहात. (असं म्हणत बच्चू कडूंनी परवानगी पत्र फाडलं.)

पाहा व्हिडीओ : नेमकं काय घडलं?

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Nashik News : नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Dhananjay Munde: राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पण धनंजय मुंडे परळीतच; वाल्मिक कराड फसल्याने धनुभाऊंची पुरती कोंडी
राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पण धनंजय मुंडे परळीतच; वाल्मिक कराड फसल्याने धनुभाऊंची पुरती कोंडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Nashik News : नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Dhananjay Munde: राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पण धनंजय मुंडे परळीतच; वाल्मिक कराड फसल्याने धनुभाऊंची पुरती कोंडी
राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पण धनंजय मुंडे परळीतच; वाल्मिक कराड फसल्याने धनुभाऊंची पुरती कोंडी
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Embed widget