Babajani Durrani on Sharad Pawar, छत्रपती संभाजीनगर : "शरद पवार साहेबांना सोडून गेलेले अनेक पाहिले, ते पुन्हा विधानभवनात दिसले नाहीत. ते शून्य झाले, बरं झालो मी शून्य होण्याआधी परत आलो", असे विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी (Babajani Durrani) म्हणाले. बाबाजानी दुर्रानी यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar NCP) सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत दुर्रानी यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी घनसावंगीचे आमदार राजेश टोपेही (Rajesh Tope) उपस्थित होते. 


शरद पवार यांच्याकडे आज मुस्लिम समाज मोठ्या अपेक्षने पाहात आहे


बाबाजानी दुर्रानी म्हणाले, 10 वर्षात देशात जातीवाद पसरवला. शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे आज मुस्लिम समाज मोठ्या अपेक्षने पाहात आहे. जोपर्यंत देशात परिवर्तन होत नाही, तोपर्यंत आपणास दीर्घायुष्य मिळावे. मला देखील खंत वाटते मी साहेबांना का सोडले? लोकसभा निवडणूक लोकांनी भाजपविरोधात हातात घेतली होती. शरद पवारांच्या (Sharad Pawar) नेतृत्वाखाली राज्यात सत्तापरिवर्तन होणार आहे. आम्ही कुठेही असलो तरीही आतून शरद पवार यांच्यासोबत होतो आणि त्यांना मदत देखील केली. मुस्लिम समजाचे उलमा यांचा दबाव होता की शरद पवार गटासोबत राहायला पाहिजे. 


पद्मसिंह पाटील राष्ट्रवादीत असताना आम्ही मराठवाड्यात एकत्र काम केलं


राजेश टोपे म्हणाले, पद्मसिंह पाटील राष्ट्रवादीत असताना आम्ही मराठवाड्यात एकत्र काम केलं. आम्ही एस. काँग्रेस वाढवली. मला एवढचं सांगायचं आहे की शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात सत्तापरिवर्तन होणार आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जी जबाबदारी मी मजबूतीने पार पाडील. लोकसभेच्या 10 पैकी 8 जागा आपण जिंकलो. दोन जागा चिन्हामुळे जिंकता आल्या नाहीत. जे नेते भारतीय जनता पक्षासोबत गेले त्यांना मदत करण्याची लोकांची मानसिकता नाही. ज्या माणसामुळे मी आमदार झालो त्यांच्यासोबत येण्याची संधी मला मिळाली. 


महाविकास आघाडीची सत्ता आलीच पाहिजे असं प्रास्तविक शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत केलं. 15 लाख चुनाव जुमला असल्याचे शहा म्हणाले होते. मग लाडकी बहीण योजना चुनावी जुमला नाही का? सर्व सामान्य लोकांच्या कराच्या पैशातून ही योजना राबवली जात आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे बॅनर लावून महिलांना या योजनेचा फायदा मिळवून द्यावा, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. 



इतर महत्वाच्या बातम्या 


Chandrakant Patil on Majha Maha Katta : त्यावेळी एकनाथ शिंदे माझ्या मदतीला धावले, चंद्रकांत पाटलांनी सांगितला पडद्यामागचा किस्सा!