Chandrakant Patil on Majha Maha Katta : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर राज्यात भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष असूनही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. त्यावेळी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजपच्या आमदारांना समजावताना हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, या राज्याच्या विकासासाठी मनावर दगड ठेवा, असे वक्तव्य केले होते. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र त्यावेळी एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटील यांच्या माझ्या मदतीला कसे धावून आले, याबाबत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. 'एबीपी माझा महाकट्टा' (Majha Maha katta) या विशेष कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली पाटील (Anjali Patil) यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी काहीही बोललो तरी वाद होत होते. मी राज्याचा अध्यक्ष होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या श्रद्धेमुळे आणि संघटनेच्या प्रेमामुळे आमदारांच्या प्रतिक्रिया खूप आक्रमक होत्या. त्यांना समजावताना मी माझे परंपरागत शब्द वापरणारच ना. अरे बाबांनो हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, या राज्याच्या विकासासाठी मनावर दगड ठेवा, असे मी म्हटले होते. त्यात माझे काय चुकले? त्याचा अर्थ असा लावला गेला की, एकनाथजी मुख्यमंत्री झाले हे मला आवडले नाही.
मला एकनाथ शिंदेंचे फार कौतुक वाटते
ते पुढे म्हणाले की, मला एकनाथ शिंदेंचे फार कौतुक वाटते की, मी प्रवासाला जात असताना मला एक असा फोन आला की, तुमच्याबाबत वादविवाद सुरू आहे. त्यावेळी मी म्हटलं की, वादविवाद करण्याचे काय कारण आहे? मी माझ्या कार्यकर्त्यांना अधिवेशनात समजावत होतो. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ताबडतोब दीपक केसरकर यांना सांगून दादा अडचणीत आहे, तुम्ही बोलले पाहिजे असे म्हटले. त्यानंतर दीपक केसरकर अतिशय चांगले बोलले. ते म्हणाले की, 105 आमदार, सात अपक्ष असे मिळून 112 आमदार असणाऱ्या पक्षाला उपमुख्यमंत्रीपद मिळाले तर ते पेढे वाटणार काय, त्यांना दुःख होणार, अशी पडद्यामागची स्टोरी सांगत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले होते.
आणखी वाचा