Uddhav Thakeray Banners: राज्यात सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) यांच्या भावी मुख्यमंत्री बॅनरची चांगलीच चर्चा आहे. शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यात वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री अशा मजकूराची फलके विविध जिल्ह्यांमध्ये लावण्यात आली आहेत. विधानसभेच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर या बॅनर्सची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
अकोला, बुलढाणा, सांगली, पुणे, हिंगोलीसह राज्यातील विविध जिल्ह्यात भावी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अशी बॅनर्स राज्यभरात शिवसैनिकांकडून लावण्यात आली आहेत. यातील अनेक बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला असून राज्यातील नेते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याचे दिसून येत आहे.
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर शिवसैनिकांची बॅनरबाजी
आज माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. या माध्यमातून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर शिवसेनेकडून पुन्हा एकदा दबाव वापरण्याचा प्रयत्न केला जातोय. जवळ येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून महाविकास आघाडीने समोर केलं पाहिजे, अशी मागणी या माध्यमातून शिवसैनिकांकडून केली जात आहे.
अकोल्यात बसस्थानकावर लावलेले बॅनर अज्ञातांना फाडले
राज्यभर भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा मजकूराची बॅनर्स चर्चेचा विषय होत असताना अकोल्यातील बसस्थानक चौकात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे बॅनर अज्ञातांनी फाडलेत. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून. शिवसैनिकांचा बसस्थानक चौकात ठिय्या केलाय. सिटी कोतवाली पोलिसांत ठाकरे गट देणार तक्रार देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी चढवली दर्गात चादर
आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन त्यानिमित्त बुलढाण्यातील उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुलढाण्यातील प्रसिद्ध अशा सैलानी दर्ग्यावर जाऊन चादर चढवली . उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री होवोत , त्यांना दीर्घायुष्य लाभाव यासाठी उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी सैलानी दर्ग्यावर जाऊन सैलानी बाबांना मन्नत देखील मागितली. पुरोगामी विचारांच्या ठाकरे परिवारातील सदस्याच्या प्रगतीसाठी त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून दर्ग्यावर चादर चढवून मंन्नत मागितल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सांगलीत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवरती मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केल्याने या वाढदिवसाच्या पोस्टरची चर्चा आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील युथ फाउंडेशन कडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा: