एक्स्प्लोर

''इथं आरक्षणाचं राजकारण चालेल, धर्माचं नाही''; अयोध्याचे खासदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंशी चर्चा

काल आमचे नेते आदरणीय अबू आझमी आणि नवनिर्वाचित यांची भेट घेतली, कार्यकर्त्यांनी स्वागत केले. उद्धव ठाकरे साहेबांनी अयोध्येतून विजयी झालेल्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विजयी उमेदवारांमध्ये चर्चेत आलेले खासदार म्हणजे अयोध्या (Ayodhya) लोकसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद. अयोध्येतील ज्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेवरुन राजकारण झालं, किंवा भाजपकडून (BJP) राम मंदिराचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा बनवण्यात आला. त्यामुळे, अयोध्या मतदारसंघातील भाजपचा पराभव सर्वांनाच आश्चर्य करणारा होता. त्यामुळेच, अयोध्या येथील खासदार अवेधश प्रसाद यांची देशपातळीवर चर्चा होत असून सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही सोनिया गांधींसोबत त्यांची ओळख करुन दिली होती. आता, अवधेश प्रसाद आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) भेटीसाठी मातोश्रीवर आले होते. यावेळी, त्यांच्यासमवेत सपाचे आमदार अबू आझमही (Abu Azami) होते, या भेटीनंतर बोलताना, मी परवा विशाळगडावर जाईन, असे आझमी यांनी सांगितले.   

काल आमचे नेते आदरणीय अबू आझमी आणि नवनिर्वाचित यांची भेट घेतली, कार्यकर्त्यांनी स्वागत केले. उद्धव ठाकरे साहेबांनी अयोध्येतून विजयी झालेल्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आज मी आणि धर्मेंद्र यादव आणि अब्बू आझमी  या सर्वांनी जाऊन त्यांची भेट घेतली, आमची ही भेट राजकीय बैठक नव्हती, असे अवधेश प्रसाद यांनी म्हटले. तसेच, अयोध्येत लोकांनी मला निवडून दिले, या देशात धर्माच्या आधारावर राजकारण चालणार नाही, बाबासाहेब भीमराव आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारे हे राजकारण चालेल, इथे आरक्षणाचे राजकारण चालेल आणि जो भारताला मजबूत करण्यासाठी काम करेल, तोच चालेल, असेही प्रसाद यांनी भेटीनंतर बोलताना म्हटले. 

देशात आज अनेक प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न आहे, करोडो तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे आणि आमच्या सैन्याच्या सन्मानाचा मुद्दा आहे, जो अग्निवीरचा मुद्दा आहे. चीनने आपल्या देशात प्रवेश केला आहे, या सर्व समस्या आपल्या देशासमोर आहेत. लोकांनी या प्रश्नांकडे लक्ष देऊ नये, त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी त्यांनी आता कावड रस्त्यावर नावाचा मुद्दा उपस्थित केला आहे. हा उत्तर प्रदेश इथे फक्त बंधुभाव चालेल, त्यांच्यासाठी काही चालणार नाही. जेव्हा त्यांनी अयोध्येत सर्व काही केले आणि वाईटरित्या गमावले, तेव्हा तुम्ही अंदाज लावू शकता की जनतेने त्यांची साफसफाई केली आहे, अशा शब्दात अवधेश प्रसाद यांनी भाजपवर निशाणा साधला.

परवा मी विशाळगडावर जाईन

परवा मी स्वतः विशाळगडाला जाईन, तिथल्या मशिदींवर हल्ले झाले आहेत. हे सरकार काहीच करत नाहीये, अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. हे राज्य सरकारचं अपयश आहे. कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रात संपल्याचं अबू आझमी यांनी म्हटलं. आमचे अध्यक्ष अखिलेश यादव विधानसभा निवडणुकीत जागावाटपाबाबत चर्चा करतील. इथून काहीही होणार नाही, जागांच्या संख्येवर मी यावेळी भाष्य करू शकत नाही, असे विधानसभा निवडणुकांबाबत अबू आझमी यांनी म्हटलं.  तसेच, मी काल यूपीच्या खासदारांच्या स्वागतावेळी कोणत्याही मराठी माणसाचा अपमान केला नाही. महाराष्ट्रात उत्तर भारतीय आणि मराठी लोक भावासारखे राहतात. जे लोक मराठी-हिंदी भाषिकांमध्ये भांडण आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या विरोधात मी बोलतो, असेही आझमी यांनी म्हटले. दरम्यान, काल आम्ही यूपीच्या सर्व खासदारांचे स्वागत करत असताना उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील खासदार अवधेश प्रसाद आणि धर्मेंद्र यादव यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे आज मी त्यांना मातोश्रीवर भेटण्यासाठी आणले होते, याशिवाय कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असेही आझमी यांनी सांगितले. 

हेही वाचा

त्यांच्यावर कारवाई कधी?, मी जवळून पाहिलंय; UPSC परीक्षेतील बोगसगिरीवर प्रियंका गांधींचा संताप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
CM Oath Ceremony: आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
Ajit Pawar: शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदांची चर्चा
शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदांची चर्चा
Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremonyमहायुती 2.O सरकारचा शपथविधी,सागर बंगल्याबाहेर 'महाराष्ट्र थांबणार नाही'चे बॅनरTop 9 Sec Superfast News  : Maharashtra : Mahayuti Oath Ceremony : महायुतीचा शपथविधी : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : Superfast News : महायुतीचा शपथविधी : 05 Dec 2024 : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : Devendra Fadnavis घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, शिंदेंचा निर्णय गूलदस्त्यातच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
CM Oath Ceremony: आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
Ajit Pawar: शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदांची चर्चा
शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदांची चर्चा
Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis-Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
Eknath Shinde & Devendra Fadnavis: वर्षा बंगल्यावरील अँटी चेंबरमध्ये फडणवीस-शिंदेंमध्ये नेमकी काय डिल झाली? गृहखात्याच्या मोबदल्यात शिवसेनेला कोणतं महत्त्वाचं खातं मिळणार?
देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंमध्ये नेमकी कोणती डिल झाली? शिवसेनेला गृहखात्याच्या मोबदल्यात कोणतं खातं मिळणार?
Pushpa 2 Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार, दोघांची प्रकृती गंभीर
'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
Embed widget