Atul Londhe on Nana Patole Car Accident : मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या गाडीचा भीषण अपघात (Accident News) झाला. अपघात एवढा भीषण होता की, नाना पटोले यांच्या गाडीचा पुरता चक्काचूर झाला. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण याच अपघातावरुन काँग्रेसनं भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, नाना पटोलेंच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंकाही अतुल लोंढेंनी व्यक्त केली आहे.                                   


महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत."






नाना पटोलेंच्या गाडीचा चक्काचूर 


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. भंडारा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. उभ्या गाडीला ट्रकनं मागून दिली धडक दिली. नाना पाटोले तेव्हा मिटिंग घेत होते. सुदैवानं मोठी घटना टळली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.


पाहा व्हिडीओ : Nana Patole Car Accident : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा कारचा भीषण अपघात



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nana Patole Car Accident : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा कारचा भीषण अपघात; उभ्या गाडीला भरधाव ट्रकने दिली मागून धडक