Praniti Shinde vs Ram Satpute Solapur Lok Sabha : सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून राम सातपुते आणि काँग्रसकडून प्रणिती शिंदे (Praniti Shinde vs Ram Satpute) यांच्यामध्ये कांटे की टक्कर होत आहे. दोन्ही उमेदवारांकडून (Solapur Lok Sabha)  जोरदार प्रचार कऱण्यात येतोय. मतदारसंघामध्ये (Solapur Lok Sabha) जाऊन गाठीभेटीही घेतल्या जात आहेत. गुडी पाडव्याला प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे दोन्ही एकमेकांचे विरोधक उमेदवार प्रथमच एकमेकांच्या समोर आले.  गुढीपाडवा सणानिमित्त शहरात निघालेल्या शोभायात्रामध्ये दोन्ही उमेदवार आमनेसामने आले होते. यावेळी राम सातपुते आणि समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, याला प्रतिउत्तर म्हणून प्रणिती शिंदे समर्थकांकडूनही नारेबाजी झाली. हे सर्व सुरु असताना प्रणिती शिंदे फक्त हसत हसत आणि हात जोडत प्रतिक्रिया दिली.  


सोलापुरातील बाळीवेसमध्ये पाडव्यानिमित्त शोभा यात्रेचा शुभारंभ झाला. त्यावेळी एका बाजूने राम सातपुते तर दुसऱ्या बाजूने प्रणिती शिंदे हे पूजेसाठी थांबून होते. पूजेनंतर शोभा यात्रेला सुरुवात झाली. राम सातपुते यांनी अतिशय जोशात “जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा” अशा जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर दुसरीकडे प्रणिती शिंदे यांच्या समर्थकांनी जय भवानी, जय शिवाजी तसेच जय श्रीराम चा नारा दिला. यावेळी दोन्ही उमेदवारांनी शोभायात्रेत सहभाग नोंदवला. दुसरीकडे प्रणिती शिंदे यांनी महिलांसोबत फुगडी खेळली तसेच अनेक महिलांनी त्यांच्यासोबत सेल्फीही काढली. यावेळी भाजप उमेदवार राम सातपुते मात्र आक्रमक घोषणाबाजी देताना दिसून आले. 


पाहा व्हिडीओ - 




सोलापुरात हिंदू नववर्ष समितीतर्फे पाडव्याला शोभयात्रा काढण्यात आली. यावेळी भाजप आणि काँग्रेस उमेदवार आमनेसामने आले. सोलापूर लोकसभेचे काँग्रेस आणि भाजपचे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या समोर उभे ठाकले. प्रणिती शिंदे आणि राम सातपुते पहिल्यांदाच आमने-सामने आले. राम सातपुतेंकडून जय श्रीरामचा जयघोष तर प्रणिती शिंदे समर्थकांकडूनही जय श्रीरामची घोषणाबाजी  झाली. राम सातपुते यांच्याकडून जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा अशी घोषणाबाजी झाली. तर प्रणिती शिंदे समर्थकांकडून जय भवानी, जय शिवाजी आणि जय श्रीराम चा नारा देण्यात आला. 


राम सातपुतेंचा प्रणिती शिंदेंवर हल्लाबोल - 


गुडी पाडव्याच्या निमित्ताने सोलापूरकरांना (Solapur) राम सातपुते यांनी शुभेच्छा दिल्या. याचवेळी प्रतिस्पर्धी उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. "हा देश पुन्हा एकदा वैभवला जावे, सोलापूरचा विकास व्हावा, सोलापुरात विमानतळ, आयटी पार्क सुरु करण्याचा संकल्प करत आहेत. हे हिंदूचे सण आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या वडिलांनी भगवा आंतकवाद शब्द वापरला होता. पण हिंदू सहिष्णू आहेत, ही गुडी म्हणजे भगवा आहे, त्यांनी काही म्हटलं तरी या हिंदू नववर्षाच्या त्यांना देखील आम्ही शुभेच्छा देतो, असे सातपुते म्हणाले.