एक्स्प्लोर

मागच्या निवडणुकीत घडलं ते यंदाही घडणार, काँग्रेस आमदार क्रॉस वोटिंग करणार, भाजपचा मेगाप्लॅन

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला, त्याशिवाय आमदारकीही सोडली. ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Ashok Chavan Rajya Sabha : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan)  यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकारण (Maharashtra Politics)  तापलं आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला, त्याशिवाय आमदारकीही सोडली. ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार आहे. राज्यसभेत  (Rajya Sabha) भाजपाने चार उमेदवार देण्याचा डाव आखला आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसची गणितं बिघडली आहेत. दुसरीकडे भाजपला फायदा झालाय. भाजपने चौथ्या उमेदवारीसाठी प्लॅन तयार केलाय. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आमदार क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता आहे. गतवर्षी  झालेल्या राज्यसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले होते. आताही पुन्हा क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

काँग्रेस आमदार क्रॉस वोटिंग करणार ? 

27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदार  क्रॉस वोटिंग करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षांतरबंदी कायद्यामुळे काँग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये सध्या तरी प्रवेश येणार नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करण्यासाठी भाजपचं मेगा प्लानिंग सुरु केला आहे. अनेक आमदारांनी अशोक चव्हाण यांना समर्थन दाखवलं आहे. मात्र पक्षांतरबंदी  कायद्यामुळे लगेच अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणं आमदारांना शक्य नाही. राज्यसभेच्या एका उमेदवाराला 40.9 चा कोठा ठरलेला आहे तो काँग्रेस पूर्ण करते. मात्र गुप्त मतदान असल्याने कांग्रेसचे काही आमदार क्रॉस वोटिंग करण्यासाठीचा मोठा प्लान सुरु करत आहे. महायुती सहापैकी पाच जागा जिंकत आहे मात्र एक जागा कांग्रेसला जाताना पाहायला मिळत आहे. क्राॅस वोटींगमुळे सहावी जागा ही महायुती जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

अशोक चव्हाण यांची राज्यसभेची तयारी - 

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. 12,300 रुपयांची थकबाकी तातडीने भरण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागानेही घाईघाईने सोमवारी संध्याकाळी एनओसी जारी केली आहे. साधारणपणे खासदार आणि आमदारांना निवडणूक लढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसची एनओसी आवश्यक असते. उमेदवारी अर्जासोबत त्यांना एनओसी द्यावी लागते. अशोक चव्हाण यांच्यावर नागपूरच्या रवी भवनाचे 12,300 रुपयांचे देयक होते. सोमवारी संध्याकाळी रवी भवनचे 12,300 रुपयांचे थकबाकीची रक्कम भरण्यात आली आणि पीडब्ल्यूडी ने चव्हाण यांना देण्यात आली असून त्याची प्रत नांदेडला पाठवण्यात आली आहे. यामुळे चव्हाण यांना घाईघाईने एनओसी देणे ही राज्यसभेची पूर्वतयारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

6 जागांसाठी मतांचं गणित काय?  

  • या सहा जागांसाठी प्रत्येक पक्ष मतांची जुळवाजुळव करत आहे. 
  • महाराष्ट्र विधानसभेचे 288 सदस्य आहेत, त्यापैकी शिवसेनेचे सांगलीतील आटपाडीचे आमदार अनिल बाबर आणि भाजपचे अकोला पश्चिम गोवर्धन शर्मा या दोन आमदारांचं निधन झालं आहे, तर अशोक चव्हाण यांचा राजीनामा आणि नागपूरचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे. 
  • त्यामुळे 284 आमदार उरतात भागिले रिक्त जागांची संख्या 6 + 1 = 40.57
  • राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 40.57 इतका मतांचा कोटा  असेल.
  • भाजपकडे 104 आणि अन्य 13 अपक्ष आमदारांची मतं आहेत.त्यानुसार भाजपच्या 3 जागा सहजपणे निवडून येऊ शकतात.
  • एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 39 आमदार आणि 10 अपक्षांची मतं आहेत. त्यानुसार शिंदे गटाची एक जागा निवडून येऊ शकेल.
  • काँग्रेसकडे 45 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यानुसार काँग्रेसची एक जागा निवडून येण्यास काहीही अडचण येणार नाही.
  • पण अशोक चव्हाण भाजपमध्ये आमदार जास्त घेऊन आल्यास हे गणित मात्र बिघडू शकतं..

आणखी वाचा :

BJP Plan for Rajya Sabha Election : मविआला राज्यसभेची एकही जागा न देण्याचा भाजपचा मेगाप्लॅन!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी अडकणार विवाहबंधनात, निकाहाची तारीख ठरली; व्हायरल पोस्टमुळे खळबळ
सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी अडकणार विवाहबंधनात, निकाहाची तारीख ठरली; व्हायरल पोस्टमुळे खळबळ
बाजार समित्यांचा गुलाल उधळण्यासाठी आणखी वाट पाहा; सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
बाजार समित्यांचा गुलाल उधळण्यासाठी आणखी वाट पाहा; सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
'नाद' खुळा... मद्यधुंद तलाठी कार्यालयात दिवसाच झोपला; रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात दाखल
'नाद' खुळा... मद्यधुंद तलाठी कार्यालयात दिवसाच झोपला; रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात दाखल
Sudhir Mungantiwar : रामदास कदमांच्या मागणीकडे भाजपचे दुर्लक्ष? 'ती' एकनाथ शिंदेंची अधिकृत भूमिका नसल्याचं मत
रामदास कदमांच्या मागणीकडे भाजपचे दुर्लक्ष? 'ती' एकनाथ शिंदेंची अधिकृत भूमिका नसल्याचं मत
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8 PM : 20 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRamdas Kadam On BJP :  100 + जागा द्या नाहीतर सर्व 288 जागा लढवू- रामदास कदमMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा : मुंबई सुपरफास्ट : ABP Majha : 6 PMTOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 5.30 PM : 20 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी अडकणार विवाहबंधनात, निकाहाची तारीख ठरली; व्हायरल पोस्टमुळे खळबळ
सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी अडकणार विवाहबंधनात, निकाहाची तारीख ठरली; व्हायरल पोस्टमुळे खळबळ
बाजार समित्यांचा गुलाल उधळण्यासाठी आणखी वाट पाहा; सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
बाजार समित्यांचा गुलाल उधळण्यासाठी आणखी वाट पाहा; सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
'नाद' खुळा... मद्यधुंद तलाठी कार्यालयात दिवसाच झोपला; रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात दाखल
'नाद' खुळा... मद्यधुंद तलाठी कार्यालयात दिवसाच झोपला; रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात दाखल
Sudhir Mungantiwar : रामदास कदमांच्या मागणीकडे भाजपचे दुर्लक्ष? 'ती' एकनाथ शिंदेंची अधिकृत भूमिका नसल्याचं मत
रामदास कदमांच्या मागणीकडे भाजपचे दुर्लक्ष? 'ती' एकनाथ शिंदेंची अधिकृत भूमिका नसल्याचं मत
Palghar Vadhavan: पालघरच्या वाढवण बंदराला केंद्राची  मंजुरी, मात्र स्थानिकांकडून विरोध तर काहींकडून पाठिंबा
पालघरच्या वाढवण बंदराला केंद्राची मंजुरी, मात्र स्थानिकांकडून विरोध तर काहींकडून पाठिंबा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2024 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2024 | गुरुवार
पुण्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट; घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक, पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा
पुण्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट; घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक, पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा
Nashik Crime : नाशिकच्या बिल्डरकडून महाविद्यालयीन तरुणास गंडा, गुंतवणूक करण्यास भाग पाडत उकळले लाखो रुपये
नाशिकच्या बिल्डरकडून महाविद्यालयीन तरुणास गंडा, गुंतवणूक करण्यास भाग पाडत उकळले लाखो रुपये
Embed widget