Ashok Chavan on Majha Katta : "दिल्लीत महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थिती सांगितली होती. मला गद्दार म्हटले जाईल, हे माहिती होते. मी एकाही आमदाराला पक्ष सोडायला सांगितले नाही. प्रत्येकाच्या मनातलं समजून घेतलं तर भविष्याच काय असा प्रश्न आहे. विधानसभा अध्यक्षपद सोडणे ही नाना पटोलेंची घोडचूक होती. सरकारही गेले नसते. विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा ही फार मोठी गोष्ट होती. नाना पटोलेंवर सोपवण्यात आलेली जबाबदारी संभाळण्यात अपयशी ठरले आहेत, असे भाजप नेते अशोक चव्हाण म्हणाले. ते 'माझा कट्ट्या'वर बोलत होते. अशोक चव्हाण यांनी 'माझा कट्ट्या'वर काँग्रेसच्या चुकांचा पाढा वाचला आहे. 


अशोक चव्हाण म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला. लोकसभेचा अनुभव मला आहे. अनेक वर्ष मी विधानसभेतही काम केलंय. माझा भाजपसाठी उपयोग होईल. या क्षेत्रात काम करताना काही वेळेस पराभवलाही सामोरे जावे लागले. गृहप्रवेश करताना आयुष्याची चांगली सुरुवात करता यावी, अशी माझी इच्छा आहे. आमच्या सहकाऱ्यांना आनंद झाला असेल की आपला स्पर्धक दुसऱ्या पक्षात गेला. 



निवडणुकीसाठी जोरात तयारी करावी लागते


 गेल्या दीड दोन वर्षांपासून मी अनुभवतो. निवडणुकीसाठी जोरात तयारी करावी लागते. गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून काँग्रेस नाही. तिथे त्यांचे कार्यकर्ते देखील नाही. कोकणात काँग्रसचे नाव देखील नाही. ज्या मनाने एकजूटीने प्रयत्न करायला पाहिजेत. तसे सुरु नाही. कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणे गरजेचे असते. अनेक लोक वर्षानुवर्षे संधी कधी मिळेल याची वाट पाहत असतात, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 


नाना पटोले अपेक्षेप्रमाणे काम करु शकले नाहीत. बॉम्बस्फोट झाल्यानंतर माझ्यावर काँग्रसची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तेव्हा मी जिद्दीने लढलो. विधानसभेच्या 82 जागा आणल्या. तेव्हा राष्ट्रवादीपेक्षा 22 जागा जास्त आणल्या होत्या. अनेक जिल्हे काँग्रेससाठी आम्ही संभाळले. ते काही सोपे काम नव्हते. नेतृत्व करणारा माणूस प्रॉपर पाहिजे. काँग्रेसमधील प्रत्येकाला भविष्याबाबत चिंता वाटते, असेही अशोक चव्हाण या वेळी बोलताना म्हणाले. 


नाना पटोलेंकडून एककल्ली कारभार सुरु 


नाना पटोलेंबाबत अशोक चव्हाण म्हणाले, ज्यांच्यावर राज्य पातळीवर जबाबदारी आहे. त्यांच्याकडून एककल्ली कारभार सुरु आहे. बैठकीत जे ठरत ते ग्राऊंडवर जाऊन करावे लागते. एखाद्या व्यक्तीवर जबाबदारी दिली तर त्याच्या रिझल्टचाही विचार करायला हवा. गेल्या काही वर्षात प्रत्येक जिल्ह्यात मी कार्यकर्त्यांशी संपर्कात आहे. तिथे फार निराशा आहे. आज ज्या पद्धतीने काँग्रेसचा कारभार सुरु आहे. मला वाटतय की काँग्रेसमध्ये काहीच आऊटपूट दिसत नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis : गेट वेल सून उद्धव ठाकरे विरुद्ध गेट आऊट सून फडणवीस! शाब्दिक चकमकीनंतर आता पोस्टर वाॅर सुरु