Sushma Andhare on Rane Family : "चिपळूण, गुहागरमध्ये निलेश राणे (Nilesh Rane) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या संबंधाने जी काही घटना घडली. ती पाहाता मागच्या 8 ते 10 महिन्यांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि राणे पिता-पुत्रांनी उच्छाद मांडलाय. त्यामुळे कोणाचाही सहज प्रतिक्रिया आहे. मराठा समाजाबाबत नारायण राणे यांनी जी व्यक्त केली, ती उद्विग्न करणारी आहेत. राणे पिता-पुत्रांनी ही भाषा थांबवली नाही तर गुहागर येथील घटना प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्यासोबत ही घटना घडू शकते", अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिली आहे. चिपळूणमध्ये राडा झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


सुषमा अंधारे म्हणाल्या, गुहागर येथे घडलेली घटना ही शिवसैनिकांची सहज प्रतिक्रिया आहे. कारण राणे पिता-पुत्र गेल्या पाच सहा महिन्यापासून ज्या पद्धतीची भाषा वापरत आहे ती कोणत्याही माणसाला पटणारी नाही. राज्यसभेची जागा मिळवण्यासाठी नारायण राणे यांनी सर्व प्रकारच्या पातळ्या सोडल्या आहेत. जाणीवपूर्वक दोन समाजात - धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राणे कुटुंबिय करत आहेत. त्यामुळे ही प्रतिक्रिया सहज आणि स्वाभाविक आहे उलट राणे पिता-पुत्रांनी ही भाषा थांबवली नाही तर गुहागर येथील घटना प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्यासोबत ही घटना घडू शकते. तसेच गुहागर येथे घडलेली घटना ही एक प्रकारे पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडली असल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे.


कोकणात राणे- भास्कर जाधवांमधील वाद चिघळला 


कोकणात नारायण राणे आणि भास्कर जाधव यांचा वाद चिघळला आहे..त्यातच माजी खासदार निलेश राणे यांची गुहागर येथे सभा होणार आहे. त्यापूर्वीच आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना धमकीचे फोन आणि मेसेज आल्याने  कार्यालया बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी पोलिस अलर्ट मोडवर आहेत. 


चिपळूणमध्ये निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक 


भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane Guhagar) यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या चिपळूणमधील कार्यालयासमोर निलेश राणे यांचा ताफा आला. त्यावेळी ही दगडफेक झाल्याचं सांगण्यात येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


निलेश राणे यांच्या ताफ्यावर चिपळूणमध्ये दगडफेक, भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर राडा