Ashok Chavan : मी खासदार झाल्याने मतदारसंघ रिक्त, पक्षाने संधी दिल्यास श्रीजया निवडणूक लढेल; अशोक चव्हाणांची मुलीसाठी फिल्डिंग
Ashok Chavan on Vidhansabha Election : "मी राज्यसभेचा खासदार झाल्याने भोकर मतदारसंघ रिक्त आहे. भारतीय जनता पक्षाने संधी दिली तर श्रीजया चव्हाण भोकर मतदारसंघातून निवडणूक लढेल"
Ashok Chavan on Vidhansabha Election : "मी राज्यसभेचा खासदार झाल्याने भोकर मतदारसंघ रिक्त आहे. भारतीय जनता पक्षाने संधी दिली तर श्रीजया चव्हाण भोकर मतदारसंघातून निवडणूक लढेल", असं भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले आहेत. अशोक चव्हाण आणि श्रीजया चव्हाण यांनी 'एबीपी माझा'ला विशेष मुलाखत दिली. यावेळी अशोक चव्हाण बोलत होते. अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे त्यांनी मुलीसाठी भोकर विधानसभेसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.
क्रिकेटमध्ये आयपीएलने जागा घेतल्या, तशीच परिस्थिती राजकीय क्षेत्रात झाली
अशोक चव्हाण म्हणाले, राजकारणामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. एकेकाळी राजकारणात परिस्थिती 'सेट' असायची. मात्र, आता तसं काही राहिलेलं नाही. क्रिकेटमध्ये आयपीएलने जागा घेतल्या. तशीच परिस्थिती राजकीय क्षेत्रात झालेली आहे. अनेक फेरबदल दिसत आहेत. अनेक नवीन चेहरे दिसत आहेत. पक्षाच्या काम करण्याच्या परिस्थितीतही बदल झाला आहे. नॅरेटीव्ह सेट करण्याचा नवीन प्रकार सुरु झाला आहे. या सर्व परिस्थितीत स्वत:ला मोल्ड करण्याची गरज आहे, असं मला वाटतं. मी 1980 पासून राजकारण जवळून पाहतोय. मला राजकीय क्षेत्रात 40 वर्षांचा अनुभव आहे. राजकीय क्षेत्रात नवीन चॅलेंज निर्माण झाले आहेत. प्रत्येक इलेक्शनला काहीना काही मुद्दा असतो. नवीन विषय समोर येतात, त्याला हाताळलं पाहिजे.
सध्या माध्यमं बदललेली आहेत, लोकांपर्यंत पोहोचण्याची साधनं बदललेली आहेत
पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, सध्या माध्यमं बदललेली आहेत. लोकांपर्यंत पोहोचण्याची साधनं बदललेली आहेत. सोशल मीडिया फार इफेक्टिव झालेला आहे. खोट्या नाट्या बातम्या देऊन फेक नेरेटिव्ह सेट केला जातो. लोकांची दिशाभूल केली जाते. मतदारांपर्यंत पोहोचणं आणि आपली भूमिका मांडणे हे पहिल्यापेक्षा आव्हानात्मक झाले आहे. जे खोटं नाटं बोललं जातं, त्यावरही तुम्हाला भूमिका घ्यावी लागते. जे काही चांगलं आपण केलेलं आहे, त्यासाठी अगोदर मार्केटिंगची गरज पडायची नाही. मतदारसंघात मी पाणी आणलयं, सिंचनाची सोय केली, रस्ते केले, यासाठी अगोदर मार्केटिंगची गरज पडायची नाही. आता काही नाही केलं की लोक फोकस करत आहेत. त्यामुळे आपण काय केलंय, हे सांगणं गरजेचं झालं आहे, असं अशोक चव्हाण यांनी नमूद केलं.
इतर महत्वाच्या बातम्या