एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Honour Killing: ‘हात-पाय बांधून चटके दिले’, नांदेडच्या Vishnu Kant Panchal याची कर्नाटकात निर्घृण हत्या
नांदेड येथील तरुण विष्णुकांत पांचाळ (Vishnu Kant Panchal) याची कर्नाटकच्या नागमपल्ली येथे झालेल्या निर्घृण हत्येमुळे खळबळ उडाली आहे. 'कर्नाटक संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (KCOCA) गुन्हा दाखल करण्याची मागणी' विष्णुकांतच्या कुटुंबीयांनी केली आहे. प्रेमसंबंधांच्या संशयावरून विष्णुकांतला काही जणांनी बेदम मारहाण केली. त्याचे हात-पाय बांधून त्याला चटके देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आंतरराज्यीय स्तरावर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















