Anil Desai VIDEO : आधी गैरसमजातून वाद, नंतर खांद्यावरून घेऊन नाचले; अनिल देसाई आणि चेंबूरमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नेमकं काय घडलं?
South Central Mumbai Election : दक्षिण मध्य मुंबईमध्ये महाविकास आघाडीकडून अनिल देसाई हे उमेदवार असून महायुतीच्या राहुल शेवाळेंशी त्यांची लढत आहे.
मुंबई : दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई चेंबूर पांजर पोळ परीसरात प्रचारासाठी आले असताना स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला आणि बाचाबाची करत त्यांना निघून जाण्यास सांगितल्याची चर्चा होती. पण ही गोष्ट गैरसमजातून झाली असल्याचं लक्षात येतात तेच कार्यकर्त्यांनी अनिल देसाईंना खांद्यावर घेऊन नाचले.
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई हे ठिकठिकाणी सभा आणि बैठका घेत आहेत. चेंबूरमधील पांजर पोळ या ठिकाणी ते गेले असता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि अनिल देसाईंच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला. अनिल देसाईंनी या ठिकाणाहून निघून जावं, त्यांनी या ठिकाणी प्रचाराला येऊ नये अशी स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी केली. त्यानंतर दोन्ही गटामध्ये काहीवेळ बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
पण नंतर ही गोष्ट गैरसमजातून झाल्याचं लक्षात येतात दोन्ही गट पुन्हा एकत्र आले. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते अनिल देसाईंना खांद्यावर घेऊन नाचले.
पण सुरूवातीला अनिल देसाईंनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गैरसमजातून विरोध केला, नंतर मात्र सर्व सुरळीत झालं.
निवडणुकीला आता अवघे चारच दिवस राहिले असताना काँग्रेस आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये गैरसमजातून ही घटना घडली. त्यामुळे आगामी काळात असे गैरसमज मिटवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून काय पावलं उचलली जातात हे पाहावं लागेल.
ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची जागा
दक्षिण मध्य मुंबई लोकसभेची जागा ही ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची जागा असून त्या ठिकाणी अनिल देसाई हे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे आहेत. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामध्ये विधानसभेचे अणुशक्तीनगर आणि चेंबूर हे मुंबई उपनगर जिल्ह्यातले दोन मतदारसंघ येतात. तर मुंबई शहर जिल्ह्यातले धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम हे विधानसभा मतदारसंघ येतात.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे कॅप्टन तामिळ सेल्वन हे सायन कोळीवाड्याचे, भाजपचे कालिदास कोळंबकर हे वडाळ्याचे आणि शिवसेनेचे सदा सरवणकर हे माहीमचे आमदार आहेत. राहुल शेवाळेंना या तिनही आमदारांचा आणि त्यांच्या पक्षांचा पाठिंबा आहे.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर चेंबूरमधून आणि धारावीतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आमदार आहेत. या दोन्ही आमदारांचा आणि त्यांच्या पक्षाचा अनिल देसाईंना पाठिंबा आहे. तर नवाब मलिक हे अणुशक्ती नगरचे आमदार आहेत.
VIDEO Anil Desai Opposed by Congress : अनिल देसाईंसह काँग्रेस कार्यकर्त्यांची बाचाबाची,अंतर्गत वाद चव्हाट