Raigad Loksabha : "रायगडच्या जनतेने महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचं निर्णय घेतलेला आहे. आता फक्त निकालाची औपचारिकता बाकी आहे. उद्याच्या निकालात त्याची औपचारिकता पूर्ण होईल. एक्झिट पोल हा फक्त चर्चेचा विषय आहे. आता तो एक्झिट पोल थट्टेचा विषय झालाय. सगळ्यात विरोधी पक्षांनी एक्झिट पोलवर बहिष्कार टाकलाय", असे रायगड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते. 


महाविकास आघाडी महाराष्ट्रात  किमान 34 जागा जिंकेल


अनंत गीते म्हणाले, एक्झिट पोल म्हणजे अंतिम निकाल नाही. उद्याच्या निकालानंतर जनता ठरवेल कोणाला हद्दपार करायची. उद्याच्या निकालानंतर भाजप 400 पार करता करता हद्दपार सुद्धा होईल.  महाविकास आघाडी महाराष्ट्रात  किमान 34 जागा जिंकेल. शरद पवार व उद्धव ठाकरे  यांचा विश्वासघात झालेला आहे. त्यामुळे जनता त्यांना नक्कीच साथ देईल. 


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महाराष्ट्रात एकही जागा जिंकणार नाही


महाराष्ट्राच्या मातीने कधीही विश्वासघात स्वीकारलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महाराष्ट्रात एकही जागा जिंकणार नाही.  महाराष्ट्रात एकही जागा येणार नाही, खातंही उघडलं जाणार नाही. मी या निवडणुकीत दीड लाखाच्या मतांनी निवडून येईल, असा विश्वासही अनंत गीते यांनी व्यक्त केला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Congress Candidate List : काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर, गडकरींविरोधात ठाकरे; नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा-गोंदियाचे उमेदवार ठरले