Nilesh Rane, Ratnagiri Sindhudurg : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय नक्की आहे. दोन लाख मताने ते निवडून येतील आणि त्यामुळे जल्लोषाच्या बाजारात जेवढ्या वस्तू आहेत त्या विकत आम्ही  घेतल्या आहेत. सण साजरा करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही दोन दिवस आधीच भरून ठेवल्या आहेत. उद्या निकाल लागला की जल्लोष साजरा होणार आहे. आम्ही किमान दोन लाखांनी या निवडणुकीत निवडून येऊ, असा विश्वास रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे भाजप उमेदवार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी व्यक्त केला. 


नारायण राणे शंभर टक्के निवडून येतील


निलेश राणे म्हणाले, निवडणूक आम्ही युद्धासारखी लढतो. नारायण राणे शंभर टक्के निवडून येतील. आमच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद होता. राणे साहेब जिथे जिथे जात होते तिथे लोक म्हणत होते आम्हाला तुम्हाला मतदान करायचे आहे. विनायक राऊत हे सपशेल फेल ठरले होते.  कुठल्या विषयात त्यांना मार्क मिळाले नव्हते. जेव्हा विरोधक फेल होतो तेव्हा त्याचा फायदा उमेदवार म्हणून तुम्हाला नक्की होत असतो. दहा वर्षात विनायक राऊत यांनी एक साधी बालवाडी देखील उभी केली नाही.  


राज ठाकरेंच्या सभेनंतर आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळाला


विनायक राऊत दहा वर्ष फक्त फुटाणे दाखवत राहिले.  सर्व अडकून राहिलेले विषय नारायण राणे सोडवतील हा विश्वास आम्ही लोकांना दाखवला. राज ठाकरे यांच्या सभेचा आम्हाला फायदा झाला. राज ठाकरेंच्या सभेनंतर आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळाला, असंही निलेश राणे यांनी सांगितले. कोकण पदवीधर मधून निरंजन डावखरे हे निवडून येतील. निरंजन डावखरे यांच्यासाठी मी प्रचार सुरू केलेला आहे.  निरंजन डावखरे यांच्यासाठी पहिली सभा मी कुडा मालवणमध्ये लावली आहे, आमच्या घरातला एक सदस्य याला उमेदवार मिळाली, असंही निलेश राणे म्हणाले आहेत. 


नारायण राणे म्हणाले, देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच उद्या निकाल आहे. या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा भाजपचा उमेदवार म्हणून मी उभा होतो, जनतेने मला चागलं प्रतिसाद दिला. या निवडणुकीत विजयी होणार याची मला पूर्ण खात्री आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वाद आणि सहकार्यामुळे उमेदवारी मिळाली. मला चागलं यश मिळेल याची मला खात्री आहे. कणकवली मधील वरवडे येथील घराच्या देवाला नमस्कार करण्यासाठी जात असून तिथून रत्नागिरीसाठी निघणार आहोत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर गड राखणार की घड्याळाची टिकटिक वाजणार; ठाकरे अन् पवारांची प्रतिष्ठा पणाला