Congress Candidate List : सध्या निवडणुकीचं (Lok Sabha Election 2024) वेध लागलं असून सर्व पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून देशातील उमेदवारांची चौथी यादी (Congress Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांची (Maharashtra Congress Candidate List) ही दुसरी यादी आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत विकास ठाकरे, रश्मी बर्वे, डॉ. प्रशांत पडोळे आणि डॉ. नामदेव किरसान या चार नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरींविरोधात विकास ठाकरे तर रामटेकमधून रश्मी बर्वेंना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.
काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर
यामध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात विकास ठाकरे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, रामटेक मतदारसंघात काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना लोकसभेसाठी संधी देण्यात आली आहे. नागपूर , रामटेक यासह भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर हे लोकसभा मतदारसंघही काँग्रेसकडे गेले आहे. काँग्रेसने भंडारा-गोंदिया मतदारसंघातून डॉ. प्रशांत पडोळे यांना खासदारकीसाठी संधी दिली आहे. तर गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी डॉ. नामदेव किरसान यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.
दुसऱ्या यादीत चार जणांना उमेदवारी
काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या आधी पहिल्या यादीत काँग्रेसने सात उमेदवारांना लोकसभेसाठी तिकीट दिलं आहे.
काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर
- नागपूर - विकास ठाकरे
- रामटेक - रश्मी बर्वे
- भंडारा-गोंदिया - डॉ. प्रशांत पडोळे
- गडचिरोली- चिमूर - डॉ. नामदेव किरसान
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत कुणाला संधी?
पहिल्या यादीत सात जणांना उमेदवारी
काँग्रेसकडून पहिल्या यादीमध्ये नंदुरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, सोलापूर आणि कोल्हापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
- नंदुरबार - गोवळ पडवी
- अमरावती - बळवंत वानखेडे
- नांदेड - वसंतराव बळवंतराव चव्हाण
- लातूर - शिवाजीराव काळगे
- सोलापूर - प्रणिती शिंदे
- पुणे - रविंद्र धंगेकर
- कोल्हापूर - शाहू महाराज छत्रपती
महत्त्वाच्या इतर बातम्या :