Pune Lok Sabha Election Result 2024 : राज्यातील लक्षवेधी असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून त्या ठिकाणी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला आहे.
राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक असलेल्या पुण्याच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे. पुणे लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीने झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपकडून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि वंचितकडून वसंत मोरे (Vasant More) हे लोकसभेच्या रिंगणात होते.
पुणे लोकसभा निवडणूक विजयी उमेदवार
उमेदवाराचे नाव | पक्ष | विजयी उमेदवार |
रवींद्र धंगेकर | काँग्रेस | |
मुरलीधर मोहोळ | भाजप | मुरलीधर मोहोळ |
वसंत मोरे | बहुजन विकास आघाडी |
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे गिरीश बापट हे विजयी झाले होते. त्यामुळे बापटांची जागा राखण्याचं आव्हान भाजपसमोर होतं. तर कसबा विधानसभा निवडणुकीत जो निकाल लागला त्याप्रमाणेच धक्कादायक निकाल देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. म्हणूनच महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांच्यासोबत मनसेतून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेल्या वसंत मोरेंनेही निवडणुकीच्या रिंगणात उतरून रंगत भरली.
पुणे 2019 सालचा निकाल -
गिरीश बापट - भाजप - 6,32,835
मोहन जोशी - काँग्रेस - 3,08,207
वंचित - अनिल जाधव - 64,793
विजयी उमेदवार - गिरीश बापट
पुण्यात किती टक्के मतदान झालं?
पुणे लोकसभा मतदानाची टक्केवारी 53.54 - टक्के
- वडगाव शेरी - 51.71 टक्के
- शिवाजीनगर - 50.67 टक्के
- कोथरूड - 52.43 टक्के
- पर्वती - 55.47 टक्के
- पुणे कॅन्टोन्मेंट - 53.13 टक्के
- कसबा पेठ - 59.24 टक्के
पुण्यात एकूण 53.54 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यात 20,61,276 मतदारांपैकी 11,03,678 पुणेकरांनी मतदान केलं आहे. त्यात 10,57,877 पुरुष मतदारांपैकी 5,84,511 म्हणजेच 55.25 टक्के एकूण पुरुषांनी मतदान केलं आहे. तर 10,03,075 महिला मतदारांपैकी 5,19,078 म्हणजेच एकूण महिलांपैकी 51.75 टक्के महिलांनी मतदान केलं आहे. इतर मतदारांपैकी (तृतीयपंथी) 324 पैकी 89 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
विधानसभानिहाय आमदारांची यादी
- वडगाव शेरी - सुनील टिंगरे (राष्ट्रवादी)
- शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
- कोथरूड - चंद्रकांत पाटील (भाजप)
- पर्वती - माधुरी मिसाळ (भाजप)
- पुणे कॅन्टोन्मेंट - सुनील कांबळे (भाजप)
- कसबा पेठ - रवींद्र धंगेकर (काँग्रेस)