एक्स्प्लोर

महायुतीत मिठाचा खडा, अमित शाहांच्या सभेपूर्वी मिटकरींचा नवनीत राणांना इशारा; शरद पवार गटानेही काढला चिमटा, नीट रडायचं

Conflict in Mahayuti अमित शाह यांनी मंगळवारी अकोल्यात सभा घेतली, त्यानंतर आज नवनीत राणा यांच्या सभेसाठी ते अमरावतीमध्ये दाखल होत आहेत.

अमरावती : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या सभेपूर्वीच अमरावतीमध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला. आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी येथील सायन्सकोर मैदानात येऊन पोलिसांना जाब विचारला. कारण, पोलिसांकडून काढलेल्या परवानगीनुसार 24 तारखेला हे मैदान आमदार बच्चू कडू यांच्या सभेसाठी देण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी ही परवानगी नाकारण्यात आली व तिथे गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, आमदार कडू संतप्त झाले होते.आता, महायुतीतील राष्ट्रवादी गटही नवनीत राणा यांच्यावर संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करुन नवनीत राणांना इशाराच दिला आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री अमित शाह यांची आज अमरावतीत सभा होत आहे. त्या सभेपूर्वीच आमदार मिटकरी संतापले आहेत.

अमित शाह यांनी मंगळवारी अकोल्यात सभा घेतली, त्यानंतर आज नवनीत राणा यांच्या सभेसाठी ते अमरावतीमध्ये दाखल होत आहेत. अमरावतीमध्ये गृहमंत्र्यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून भाजपा पदाधिकारी व राणा दाम्पत्य कामाला लागले आहे. सभेसाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर मोठा डिजिटल लावण्यात आला आहे. मात्र, आता या डिजिटल फ्लेक्सवरुनच वाद रंगल्याचे दिसून येते. कारण,आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन येथील सभामंडपाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी थेट नवनीत राणांना इशाराही दिला आहे. ''नवनीत राणाजी आपण महायुतीचा धर्म विसरला आहात. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा निवडणुकीत याची मोठी किंमत मोजावी लागेल.'', अशा शब्दात अमोल मिटकरींनी राणा यांना इशारा दिला आहे. मिटकरींचा हा व्हिडिओ रिट्विट करत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही अमोल मिटकरींना चिमटा काढला आहे. असं नाही.. नीट रडायचं ! असे म्हणत प्रशांत जगताप यांनी मिटकरींना डिवचलं आहे. 

काय आहे नेमका वाद

नवनीत राणा यांच्या सभेसाठी अमरावतीमधील सायन्सकोर मैदानावर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर मोठा डिजिटल फ्लेक्स दिसून येत आहे. या फ्लेक्सवर अमित शाह यांची जाहीर सभा असा आशय लिहिला आहे. मात्र, फ्लेक्सवर दिसत असलेल्या फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उमेदवार नवनीत राणा एका बाजुला आहेत. तर, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्या बाजुला दिसत आहेत. महायुतीच्या उमेदवारासाठी सभा असतानाही या फ्लेक्सवर अजित पवारांचा फोटो नाही, त्यामुळे अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त करत महायुतीची आठवण करुन दिली आहे. 

शरद पवार गटाने काढला चिमटा

दरम्यान, अमोल मिटकरी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप यांनी शेअर करत मिटकरींना चिमटा काढला. असं नाही.. नीट रडायचं ! मोठमोठ्याने टाचा रगडून रडायचं, तरच बोनस मिळेल, अशी फिरकी मिटकरींची घेतली आहे. त्यामुळे, आता महायुतीच्या उमेदवारासाठी होत असलेल्या सभेत अजित पवारांचा फोटो झळकतो की नाही, हेच पाहावे लागेल. 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
रोहित पवारांचे प्रश्न, शरद पवारांची राज्यसभा; सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका, भिगवणच्या घटनेवरही भाष्य
रोहित पवारांचे प्रश्न, शरद पवारांची राज्यसभा; सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका, भिगवणच्या घटनेवरही भाष्य
Rohit Pawar and Naresh Arora: माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय, कॅश बॉक्सवाल्यांनो 'रोक सके तो रोक लो', रोहित पवारांचा नरेश अरोरांवर हल्लाबोल
रोहित पवारांचा नरेश अरोरांना इशारा, म्हणाले, 'मला माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड लागलंय, तुला किती पैसा....'
Satara : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार, एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, मकरंद पाटील-शंभूराज देसाईंच्या भेटीत निर्णय 
मकरंद पाटील- शंभूराज देसाईंंच्या भेटीत एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, सातारा जिल्हा परिषदेवर शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता येणार

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान
Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
Gopichand Padalkar : मुलीवर जबरदस्ती करुन व्हिडिओ केला, पोलिसांना, घरच्यांना व्हिडिओ पाठवला म्हणजे त्यांचं धाडस वाढतंय, गोपीचंद पडळकरांचा आरोप
जनआक्रोश मोर्चापूर्वी मुलीचा व्हिडिओ समोर आला; मुलीवर जबरदस्ती करत व्हिडिओ तयार केला, गोपीचंद पडळकरांचा आरोप
Share Market Update: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
Raj Thackeray Meets Eknath Shinde: राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
Crime News: दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
Satara : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार, एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, मकरंद पाटील-शंभूराज देसाईंच्या भेटीत निर्णय 
मकरंद पाटील- शंभूराज देसाईंंच्या भेटीत एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, सातारा जिल्हा परिषदेवर शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता येणार
Embed widget