'आदिवसींच्या हक्कावर अतिक्रमण', अंबादास दानवेंची शुभम गुप्ता प्रकरणावरून टीका, म्हणाले, 'आम्हीच सत्तेत येऊन चौकशी करू'
एखादा कार्यकर्ता असता तर ठीक पण इतका मोठा अधिकारी असं करतो हे चूकीचं आहे. सर्वसामान्य माणसासाठी सरकार असावे, मूठभर अधिकाऱ्यांसाठी सरकार नसावे, असं दानवे म्हणालेत.
Ambadas Danve On Shubham Gupta: राज्यात पूजा खेडकर प्रकरण ताजं असताना आता सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता (Shubham Gupta) यांनी केलेला गैरव्यवहार समोर आला आहे. आदिवासींच्या पैशाचा अपहार करत कोटयवधींचा भ्रष्टाचार केल्याचं उघड झाल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आदिवासी बांधवांच्या हक्कावरील अशा प्रकारे अतिक्रमण करणं अत्यंत चूकीचे असल्याचे ते म्हणालेत. सरकारकडून कारवाईच्या कोणत्याही अपेक्षाच नाहीत, त्यासाठी आम्हाला सत्तेत यावं लागेल, मग सत्तेत आल्यावर या सगळ्याची चौकशी करु, एखादा कार्यकर्ता असता तर ठीक पण इतका मोठा अधिकारी असं करतो हे चूकीचं आहे. सर्वसामान्य माणसासाठी सरकार असावे, मूठभर अधिकाऱ्यांसाठी सरकार नसावे, असं दानवे म्हणालेत.
सांगली महापालिकेत प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी विभागाअंतर्गत ते कार्यरत होते. या विभागात त्यांनी आदिवासींसाठी गायी-म्हशी वाटपाची योजना काढत मोठा भ्रष्टाचार केल्याचं उघड झालंय.सरकारच्या चौकशी समितीच्या अहवालात याची नोंदही झालीय. लाभार्थ्याचे पैसे स्वत:च्या खात्यावर वळवून घेणे, दुभत्या गायी म्हशींऐवजी भाकड जनावरं देणं, लाभार्थ्याला धमकावणं असे अनेक गंभीर आरोप शुभम गुप्तांवर करण्यात आले आहेत. यावरून आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी टीका केली असून अशा अधिकाऱ्यांच्या काळातील सर्वच प्रकारणाची चौकशी केली पाहिजे. असे म्हणत सरकारकडून कारवाईच्या अपेक्षा नसल्याचं सांगत आम्हीच सत्तेत येऊन चौकशी करू असं ते म्हणालेत.
काय म्हणाले अंबादास दानवे?
आदिवासी बांधवच्या हक्कावर अशा प्रकारे अतिक्रमण करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. आदिवासींनी सामाजिक प्रवाहात यासाठी प्रयत्न केले जातात. एखादा कार्यकर्ता असता तर ठीक पण इतका मोठा अधिकारी असं करतो हे चुकीचे आहे. अशा अधिकाऱ्यांच्या काळातील सर्वच प्रकारणाची चौकशी केली पाहिजे. या सरकारकडून कारवाईच्या कोणत्याही अपेक्षा नाहीत. त्यासाठी आम्हाला सत्तेत यावं लागेल, आम्ही तीन महिन्यानंतर सत्तेत आल्यावर या सगळ्यांची चौकशी करू. सर्वसामान्य माणसासाठी सरकार असावे, मूठभर अधिकाऱ्यांसाठी सरकार नसावे. असे दानवे म्हणालेत.
नेमका घोटाळा काय?
सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी विभागात कार्यरत होते. या विभागाअंतर्गत आदिवासींसाठी गायी-म्हशी वाटपाची एक योजना चालवली जाते. या योजनेचे गुप्ता हे प्रकल्प अधिकारी होते. योजनेत त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून आदिवासींच्या पैशांवर डल्ला मारल्याचा ठपका सरकारनं ठेवला आहे. लाभार्थ्यांना नियमापेक्षा दुप्पट पैसे पाठवणं, मग ते पैसे स्वतःच दुसऱ्या खात्यात वळवून घेणं, त्यासाठी लाभार्थ्यांना धमकावणं, नियमबाह्य कामं करण्यासाठी स्वतःच्या विभागातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावणं, बोगस पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सह्या जोडणं, असे अनेक गैरप्रकार गुप्ता यांनी केल्याचं सिद्ध झालं आहे. शासनाच्या समितीच्या अहवालात हे तपशीलवार नमूद करण्यात आलं आहे, आणि हा अहवाल राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्याचं इंग्रजी भाषांतर करून केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना नियमापेक्षा दुप्पट पैसे देऊन दुसऱ्या खात्यावर स्वतःच वळवून घेणं, लाभार्थ्यांना धमकावणं, नियमबाह्य कामांसाठी स्वतःच्याच विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमकावणं, बोगस पशूवैद्यक अधिकाऱ्यांच्या सह्या जोडणं असे अनेक गैरप्रकार सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता यांनी केल्याचं सिद्ध झालं आहे.
हेही वाचा: