Ambadas Danve: महाविकास आघाडीमध्ये एमआयएमला घेण्याचा प्रश्नच नाही असं म्हणत MIM सोबत जाणार नसल्याचं सांगितल्यानंतर शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नसल्याचं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे म्हणालेत. विधानसभेसाठी मुस्लिम उमेदवार देणार का?यावर त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली असून शिवसैनिकाची अपेक्षा ही समसमान नाही तर सर्वच जागा लढण्याची आहे. परंतु ही महाविकास आघाडी आहे. सर्व पक्षांना यात संधी असते शिवसेनेला देखील संधी मिळेल आणि ज्या शिवसैनिकाच्या अपेक्षा आहेत. शिवसेना मुस्लिम विरोधात आम्ही नाहीत. जे देशभक्त आहेत राष्ट्रभक्त आहेत समाजासाठी काम करणारे मुस्लिम आहेत. त्यांच्या बाजूने आम्ही आहोत. त्यामुळे शिवसेनेला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. शिवसेना हिंदुत्ववादीच असल्याचं त्यांनी सांगितलंय.


शिवसैनिकाची अपेक्षा ही समसमान नाही तर सर्वच जागा लढण्याची आहे. परंतु ही महाविकास आघाडी आहे. सर्व पक्षांना यात संधी असते शिवसेनेला देखील संधी मिळेल आणि ज्या शिवसैनिकाच्या अपेक्षा आहेत. त्या पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवू असं दानवे यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीडमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यात ते बोलत होते. 


काय म्हणाले अंबादास दानवे?


बीड जिल्हा हा राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. याच जिल्ह्यात पक्षफुटीनंतर ठाकरे गट पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागला आहे. आज विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी बीडमध्ये बैठक घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश त्यांनी  दिले आहेत. दरम्यान, मुस्लिम उमेदवारावर उमेदवारी देण्यावर दानवे म्हणाले,  हिंदुत्व म्हणजे मुसलमान नसणे असा अर्थ नाही. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. मुस्लिम विरोधात आम्ही नाहीत. जे देशभक्त आहेत राष्ट्रभक्त आहेत समाजासाठी काम करणारे मुस्लिम आहेत. त्यांच्या बाजूने आम्ही आहोत. त्यामुळे शिवसेनेला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. शिवसेना हिंदुत्ववादीच असल्याचं सांगितले आहे. 


शिवसैनिकांची अपेक्षा समसमान नाही, सर्व जागा लढण्याची


बीड गेवराई आणि परळी या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी शिवसैनिकाची अपेक्षा ही समसमान नाही तर सर्वच जागा लढण्याची असल्याचे सांगितले. परंतु ही महाविकास आघाडी आहे. सर्व पक्षांना यात संधी असते शिवसेनेला देखील संधी मिळेल आणि ज्या शिवसैनिकाच्या अपेक्षा आहेत. त्या पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवू असं दानवे यांनी सांगितले. 


हेही वाचा:


एमआयएम सोबत बैठक झाली की नाही? दानवे म्हणाले नाही, तर जलील म्हणाले माहिती घ्या, मुंबईत आमची बैठक झाली