Ambadas Danve on Imtiaz Jalil : महाविकास आघाडीमध्ये एमआयएमला (MIM) ला घेण्याचा प्रश्नच नाही. आम्ही एमआयएमसोबत जाणार नाही, त्यांच्यासोबत कुठलीही बैठक झाली नसल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिली. इम्तियाज जलील ( Imtiaz Jalil) हे खोटं बोलतात. कारण इम्तियाज जलील सांगतील की, आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार होतो, पण त्यांनी संधी दिली नाही असं  दानवे म्हणाले. मात्र, आमची मुंबईत बैठक झाली असल्याचं  जलील यांनी म्हटलं आहे.  


दानवे यांच्यापेक्षा मोठ्या नेत्यांसोबत बसलो होतो 


अंबादास दानवे यांच्या प्रतिक्रियेला इम्तियाज जलील यांनी उत्तर दिलं आहे. आमची मुंबईत बैठक झाली आहे. छोट्या नेत्यांना सांगू नका असे त्यांच्या नेत्यांनी सांगितले आहे. मी दानवे यांच्यापेक्षा मोठ्या नेत्यांसोबत बसलो होतो असंही जलील म्हणाले. मुंबईत आमची बैठक झाली असून, दानवेंनी माहिती घ्यावी. कधी आणि कुठे बैठक झाली असं जलील म्हणाले. 


विधानसभेत निवडणुकीत ठाकरे मुस्लिमांना प्रतिनिधित्व देणार ?


दरम्यान, विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे मुस्लिम उमेदवार देणार आहेत. मेरीटवर विधानसभेत निवडणुकीत ठाकरे मुस्लिमांना प्रतिनिधित्व देणार असल्याची माहिती मिळत आहे. यावर देखील जलील यांनी प्रतिक्रिया दिली. आनंदाची गोष्ट आहे की, उद्धव ठाकरे मुस्लिम उमेदवार देणार आहेत. त्यांना कळले असेल की आपण लोकसभेत का मुस्लिम उमेदवार दिले नाही. मुस्लिम मते हवे असतील तर उमेदवार द्यावे लागतील असे जलील म्हणाले. 


छत्रपती संभाजीनगरमधील पाच पैकी कुठेही लढण्याची तयारी 


दरम्यान, अंबादास दानवे यांना विनंती आहे की, उद्धव ठाकरे यांनी बोलावे की आम्हाला एमआयएम नको आहे. सर्वांना मुस्लिम मते पाहिजेत. काही लोक म्हणतात आमच्याकडे लेखी प्रस्ताव आला नाही, मग आता लेखी प्रस्ताव देखील पाठवतो असे जलील म्हणाले. शुक्रवारपासून आम्ही उमेदवार फॉर्म देणार आहोत. त्यानंतर आम्ही थांबणार नाही. छत्रपती संभाजीनगरमधील पाच पैकी कुठेही लढण्याची तयारी असल्याचे जलील म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या काही नेत्यांशी चर्चा झाली आहे. मात्र, त्यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला होता असेही जलील म्हणाले होते. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.  


महत्वाच्या बातम्या:


Imtiaz Jaleel: मविआसोबतच्या युतीबाबत जलील यांचा गौप्यस्फोट; नेत्यांसोबत चर्चा झाल्याची कबुली पण...; स्टेजवर जागा देण्यावर निर्णय होत नसल्याचा दावा