Akola News : अब्दुल सत्तार (Abdul Sattar) ही विकृती असल्याची घणाघाती टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे. "त्यांनी आता फक्त मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाला शिवीगाळ केली आहे. पुढे आणखी कुणाकुणाला करतील ते दिसेलच," असं अंबादास दानवे म्हणाले. ते अकोला इथे बोलत होते. यासोबतच शिवसेनेविरोधात ट्वीट केलेल्या अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचाही यावेळी अंबादास दानवे यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी काय-काय गमावलंय, पती मुख्यमंत्रीपदावरुन उपमुख्यमंत्रीपदावर आले आहेत, असा टोला अंबादास दानवेंनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे. 


अब्दुल सत्तारांवर टीका, अमृता फडणवीसांना टोला
याबाबत बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. "अब्दुल सत्तार ही विकृती. त्यांनी आता फक्त मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाला शिवीगाळ केली आहे. पुढे आणखी कुणाकुणाला करतील ते दिसेलच." तर 'बस्स 'उद्धव बाळासाहेब ठाकरे नामही काफी है', असं उत्तर त्यांनी चिन्ह आणि नावाच्या वादावर दिलं. याशिवाय यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. "हे स्थगिती सरकार आहे. गुजरातला मदत करणारं सरकार आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत केली नाही," असं दानवे म्हणाले. शिवसेनेविरोधात ट्विटरच्या माध्यमातून टीका करणाऱ्या अमृता फडणवीस यांनाही अंबादास दानवे यांनी टोला लगावला. "फडणवीस यांनी काय-काय गमावलं. मुख्यमंत्रीपदाचे उपमुख्यमंत्रीपदावर आलेत," असं ते म्हणाले.


मुख्यमंत्र्यांसमोर 'वर्षा' बंगल्यावर सत्तारांची शिवीगाळ? 
वर्षा बंगल्यावरील बैठकीत अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर शिवीगाळ केल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या खासगी सचिवाला शिवीगाळ केली. त्यानंतर अब्दुल सत्तार हे वर्षा बंगल्यावरील बैठकीतून निघून गेले, असं सुत्रांनी सांगितलं. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर पुढील रणनीति ठरवण्यासाठी शिंदे गटाने वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्र्यांसमोर शिवीगाळ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


ही फेक न्यूज : अब्दुल सत्तार
कालच्या बैठकीत मी कोणत्याही स्वरुपाची शिवीगाळ केली नाही. मला राजकारणात 40 वर्ष झाले आहेत, मग मी असं का वागेन? ही फेक न्यूज आहे अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार एबीपी माझाशी बोलताना केली.


संबंधित बातम्या


Abdul Sattar: शिंदे गटात वादाचा भडका! मुख्यमंत्र्यांसमोर वर्षा बंगल्यावर सत्तारांची शिवीगाळ? 


Abdul Sattar: मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सचिवाला शिवीगाळ केली? अब्दुल सत्तार यांनी स्पष्टच सांगितले