Jalna Crime News: जालन्यात एका फसवणुकीच्या गुन्ह्यात चक्क राज्य उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभूराजे देसाई यांचा पीए असल्याची बतावणी करून 2 लाख 10  हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. मुलीस नोकरी लावून देतो असे सांगत ही फसवणूक केल्याचं समोर आले आहे. चक्क मंत्र्याचा पीए असल्याचे सांगून फसवणूकीची घटना समोर आल्याने जालन्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंबादास पाटीलबा सवडे (वय 60 वर्षे,रा. अकोलादेव ता. जाफ्राबाद जि. जालना) यांची बबन देवकते याच्यासोबत देऊळगाव राजा येथे ओळख झाली. दरम्यान याच काळात बबन देवकते याने आपण मंत्री शंभूराजे देसाई यांचे पीए असून, तुमच्या मुलीला नोकरी लावून देतो असे अंबादास सवडे यांना आश्वासन दिले. सवडे यांनी सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर फोनद्वारे बबन देवकते याने अंबादास सवडे यांना नोकरी लावून देण्यासाठी वेळोवेळी 2 लाख 10 हजार रुपयांची मागणी केली. विश्वासापोटी अंबादास सवडे यांनी सुद्धा वेळोवेळी ती रक्कम देवकते याला दिली. 


आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले...


अंबादास सवडे यांनी देवकते यांना पैसे देऊनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी तगादा लावला. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अंबादास सवडे यांनी फोनवर व प्रत्यक्ष भेट्न देवकते याच्याकडे पैशाबाबत विचारपुस केली. मात्र पैशाबाबत विचारपुस करताच  एक अनोळखी महिला व अंकुश घोंगे नावाच्या व्यक्तीने त्यांना धमकावले. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार अंबादास सवडे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली असून, त्यानुसार बबन देवकते (रा. तिरूपती कॉलनी लाखाला रिसोड जि.वाशिम), अंकुश घोंगे (रा. देऊळगावराजा)  आणि एक अनोळखी महिला यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Shiv Sena Symbol Crisis : ठाकरे, शिंदे गटाला कोणतं नव चिन्ह आणि नाव? निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष


Shiv Sena Symbol Crisis : बाळासाहेबांच्या शिवसेनेचे अस्तित्व मिटवण्यासाठी दिल्लीतील मोगलांशी हातमिळवणी; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल