Ajit Pawar Speech : आपल्या बापाचं कुठं काय जातंय, अजित पवार असं का म्हणाले?
Ajit Pawar Speech : अनेक जण माझ्याकडे येतात अन् म्हणतात जिल्हा परिषद सदस्य आहेत.
Ajit Pawar Speech : "अनेक जण माझ्याकडे येतात अन् म्हणतात जिल्हा परिषद सदस्य आहेत. आता प्रशासक आहे, तुम्ही कुठले सदस्य, तुमची मुदत 2022 ला संपली आहे. आता तुम्ही तर सर्व सामान्य नागरिक आहात. पण ते म्हणतात, आता त्यांना वाईट वाटायला नको म्हणून मी म्हणतो म्हणतायेत तर म्हणू द्या. कुठं आपल्या बापाचं काय जायचं आहे, मी म्हणतो तुम्हाला शुभेच्छा आहेत", असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. आंबेगाव लोणी येथे महायुती शिरूर लोकसभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभा घेतली. यावेळी अजित पवार बोलत होते.
पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
अजित पवार म्हणाले, चाकणमध्ये वाहतुकीची कोंडी आहे. अनेकांचा वेळ वाया जातो. त्यामुळे मी रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. 20 हजार कोटींचा रिंगरोड होणार आहे. केंद्रातून पिण्याच्या पाण्याच्या योजनांना निधी मंजूर होतो. ती काम करण्याची आमची तयारी आहे. आचारसंहिता सुरु असली, तरी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अर्थात आचारसंहितेचा भंग होऊ नये, याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.
मला वळसे पाटलांनी कलमोडीचं सांगितलं होतं
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आता आचारसंहिता सुरु असल्यामुळे आम्हाला अधिकाऱ्यांना विचारता येत नाही. विवेकने आता मला नोट दिली. मला वळसे पाटलांनी कलमोडीचं सांगितलं होतं. त्यासंदर्भात दिलीप मोहितेंशीही चर्चा केली होती. दोघांचीही आदिवासी गावे यातून कव्हर होतील. त्यामध्ये सातगाव पठार देखील होते. यासंदर्भात सर्वेक्षण झालं आहे. मी दिलीपराव आणि देवेंद्रजी बसून आणि शिवाजीरावांना इन्वॉल्व करुन या योजनेचे काम करु. आम्ही उपसा सिंचन योजना सोलरवर सुरु करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला वीजेचं बील येणार नाही. फक्त पाणी पट्टी तु्म्हाला येईल, असे आश्वासही अजित पवार यांनी दिले.
कोल्हेंना आपण निवडून दिलं. कोल्हे आता काहीही बोलतात. आता त्यांच्याकडे कोणताही मुद्दा राहिला नाही. म्हणून माझ्यावर आरोप करतात. तेव्हा ते बैठकांनाही येत नव्हते. तेव्हा शूटींगमध्ये व्यस्त असायचे. आता मात्र, सांगतात की असं झालं, तसं झालं. त्यांना राजकारणात इंटरेस्ट नाही. त्यांना त्यांच्या कामात इंटरेस्ट आहे, असंही अजित पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Chhagan Bhujbal on Ajit Pawar : अजितदादांच्या 'त्या' शपथविधीची कल्पना नव्हती, पळून गेलेल्या आमदारांना आणण्यासाठी प्रयत्न केले : छगन भुजबळ