National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी कारवाई करत ईडीने यंग इंडिया लिमिटेडचे ​​कार्यालय सील केले आहे. याशिवाय काँग्रेस मुख्यालय आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानीही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ईडीच्या कारवाईनंतर काँग्रेस आता अॅक्शनमध्ये आल्याचं दिसत आहे. यंग इंडियावर केलेल्या कारवाईनंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस नेते जयराम रमेश, अजय माकन आणि अभिषेक मनू सिंघवी उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी केंद्रावर सूडाचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. 


सोनिया आणि राहून गांधी यांच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा वाढवण्यात आल्याने काँग्रेस नेते पत्रकार परिषदेत म्हटले की, पोलिसांच्या पहाऱ्याने सत्याचा आवाज दडपला जाणार नाही. महागाई, बेरोजगारी यावर प्रश्न विचारले जातील. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालयासह राहुल आणि सोनिया गांधी यांच्या घराला वेढा घातला असून या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. 


महागाई आणि बेरोजगारी विरोधात आंदोलन करणार  


यावेळी बोलताना अजय माकन म्हणाले, "एआयसीसीकडून शनिवारी एक परिपत्रक जारी करण्यात आले होते की, महागाई आणि बेरोजगारी विरोधात 5 ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात येईल. काँग्रेस नेते पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार असल्याचे सांगण्यात आले. आज आम्हाला डीसीपीकडून पत्र मिळाले की तुम्ही 5 तारखेला कोणतेही प्रदर्शन करू शकत नाही.'' ते म्हणाले, महागाई, बेरोजगारी आणि खाद्यपदार्थांवरील जीएसटी विरोधात काँग्रेस आंदोलन करत राहील. आम्ही घाबरणार नाही.


सरकार राजकारण्यांना दहशतवादी मानते का:  सिंघवी


काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, ''पोलिस कारवाई करून सरकारला जनतेची दिशाभूल करायची आहे. महागाई आणि बेरोजगारी वाहिन्यांवर ठळक बातम्या बनवय नये, अशी सरकारची इच्छा आहे. ते म्हणाले, ''सरकार राजकारण्यांना दहशतवादी मानते का? सत्य बाहेर आणण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील राहील. लोकशाही मूल्ये जपण्यासाठी काँग्रेस लढत राहील.''


इतर महत्वाच्या बातम्या: 


National Herald Case: ईडीकडून दिल्लीतले यंग इंडियाचे कार्यालय सील, नॅशनल हेराल्ड प्रकरणी कारवाई


Election : शिंदेंचा ठाकरेंना धक्का; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017 प्रमाणेच, वाढवलेले वॉर्ड रद्द
Uddhav Thackeray : नागाला कितीही निष्ठेचं दूध पाजलं तरीही तो चावतोच, बंडखोरांवर उद्धव ठाकरेंची जहरी टीका