West Bengal Cabinet Reshuffle: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. ममता यांनी मंत्रिमंडळ विस्तार करत भाजपमधून टीएमसीमध्ये आलेल्या बाबुल सुप्रियो यांच्यासह नऊ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. सुप्रियो यांच्या व्यतिरिक्त स्नेहासिस चक्रवर्ती, पार्थ भौमिक, उदयन गुहा, प्रदीप मजुमदार, ताजमुल हुसेन आणि सत्यजित बर्मन यांना राज्यपालांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ दिली. आदिवासी नेते बिरबाह हंसदा आणि बिप्लब रॉय चौधरी यांनी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून शपथ घेतली.
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पार्थ चॅटर्जी यांना अटक केलं असतानाच ममता बॅनर्जी सरकारने मंत्रिमंडळात हा फोटो फेरबदल केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतेच पार्थ चॅटर्जी यांना मंत्रीपदावरून हटवले होते. पार्थ चॅटर्जी यांच्याकडे उद्योग, वाणिज्य, उपक्रम आणि संसदीय कामकाज या पाच महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार होता.
तेव्हा नव्या मंत्रिमंडळात चार-पाच नव्या चेहऱ्यांचा समावेश केला जाईल आणि तितकेच विद्यमान मंत्री पक्षाच्या कामात लागतील, असे ते म्हणाले होते. काही मंत्र्यांचे खातेही बदलले जाऊ शकते. तसेच सध्या जेवढे मंत्री असतील तेवढे पक्षाच्या कामात लागतील. काही मंत्र्यांचे खातेही बदलले जाऊ शकतात, असं त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या:
Congress Tiranga Row: विरोधकांना तिरंग्यातही भाजप दिसू लागला असेल तर काय म्हणावे, राहुल-प्रियांका गांधींना भाजपचा टोला
Aurangabad: मुख्यमंत्र्यांविरोधातील तक्रारीवरून शिंदे गट आणि पोलिसात वाद; समर्थकांची ठाण्याबाहेर गर्दी
अवैध पद्धतीने माहितीचे हस्तांतर करणारे 348 Apps ब्लॉक, चीनच्या अॅप्सचाही समावेश; केंद्र सरकारची लोकसभेत माहिती