Young India Office Seal: नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हेराल्ड हाऊस येथील यंग इंडियाचे कार्यालय सील केले आहे. मंगळवारी ईडीने या कार्यालयाची झडती घेतली होती. त्यानंतर आज हे कार्यालय सील करण्यात आले आहे. यंग इंडियन कंपनीचे 38 टक्के शेअर्स सोनिया गांधींकडे आहेत आणि तितकेच शेअर्स राहुल गांधींकडे आहेत. यंग इंडियन ही तीच कंपनी आहे, जी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड म्हणजेच एजेएलने टेकओव्हर केली होती.


नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी ईडीने हेराल्ड हाऊससह 12 ठिकाणी छापे टाकले होते. याप्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान, सोनिया गांधी यांना ईडीने प्रश्न विचारला होता की, एजेएलच्या अधिग्रहणात 90 कोटी रुपयांच्या कर्जाचा उल्लेख का नाही? तसेच  डोटेक्स कंपनीने दिलेले 1 कोटी रुपयांचे कर्ज कोणत्या स्वरूपात घेण्यात आले होते. या प्रश्नाला उत्तर देताना सोनिया गांधी यांनी सांगितलं होतं की, या सर्व गोष्टींची माहिती त्यांना नसून मोतीलाल व्होरा यांना आहे. 


डोटेक्स कंपनीने यंग इंडियाला दिलेले एक कोटी रुपयांचे कर्ज मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून दिल्याचा ईडीला संशय आहे. अधिग्रहणात यंग इंडिया कंपनीला एजेएलचे 9 कोटींचे शेअर्स मिळाले. तर सोनिया आणि राहुल गांधी म्हणाले की, मोतीलाल व्होरा हे पैशाच्या व्यवहाराचे संपूर्ण प्रकरण पाहायचे. यंग इंडियाचे 4 शेअरहोल्डर्स सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस होते. यामध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांची कंपनीत 76 टक्के भागीदारी होती. नॅशनल हेराल्डने काँग्रेसला कर्ज फेडण्यासाठी 90 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. हे कर्ज नंतर पक्षाने माफ केले होते.


इतर महत्वाच्या बातम्या:


Election : शिंदेंचा ठाकरेंना धक्का; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017 प्रमाणेच, वाढवलेले वॉर्ड रद्द
Uddhav Thackeray : नागाला कितीही निष्ठेचं दूध पाजलं तरीही तो चावतोच, बंडखोरांवर उद्धव ठाकरेंची जहरी टीका
Vice Presidential Election 2022: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपचा मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा, पक्षाच्या बैकठकीनंतर संजय सिंह यांची घोषणा