मुंबई :  नागाला कितीही दूध पाजलं तरी चावायचं तो चावतोच असं म्हणत उद्धव  ठाकरेंनी पुन्हा बंडखोरांवर हल्लाबोल केला आहे. मातोश्रीवर जळगावातील शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव  ठाकरेंनी पुन्हा बंडखोरांवर हल्लाबोल केला आहे. एक गुलाब गेलं, दुसरे गुलाबराव वाघ आपल्यासोबत आहेत.   मुंबईतील 'मातोश्री' (Matoshree) या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी जळगावातील शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.


सर्वांना निष्ठेचं दूध पाजलं पण अवलाद गद्दार निघाली


उद्धव ठाकरे म्हणाले, कालच नागपंचमी झाली असं बोलतात की नागाला किती दूध पाजलं तरी चावायचं तो चावतोच. या सर्वांना निष्ठेच दूध पाजलं पण अवलाद गद्दार निघाली. गद्दार बोलताना बैलाला त्रास होईल असं बोलू नका बैल शेतकऱ्याचा राजा आहे. 


जळगावात भाजपनं गुलाब पाहिला आता सैनिकांचे काटे बघायचे 

जळगावमध्ये भाजपने गुलाब पाहायला आता सैनिकांचे काटे बघायचे. जळगावमध्ये एक गुलाब गेलं दुसरे गुलाबराव वाघ आपल्या सोबत आहेत. आता मी राज्यभर फिरणार आहे तेव्हा सविस्तर बोलेल. 
सदस्य नोंदणीवर भर द्या सोक्षमोक्ष व्हायचा असेल तर होऊन जाऊ द्या. विधानसभेच्या निवडणुका येऊद्या  मग दाखवून देऊ, असे देखील उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.


शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले


शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण आता शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे मी आधीच बोललो होतो.  हे परवा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलून दाखवलं की शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. त्यांना माहिती नाही की अशी अनेक आव्हाने पायदळी तुडवत त्याच्यावर आम्ही झेंडा रोवला आहे. राजकारणात हार जीत होत असते, पण संपवण्याची भाषा केली जात नाही. ती आता होत आहे. 


संबंधित बातमी :