एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Majha Maha Katta : 2024 पर्यंत काय होणार हे फक्त दोनच माणसं ठरवतील, एक म्हणजे... : प्रकाश आंबेडकर

Majha Maha Katta : 2024 पर्यंत काय होणार हे फक्त दोनच माणसं ठरवतील, एक म्हणजे नरेंद्र मोदी आणि दुसरे अमित शाह, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Majha Maha Katta : "2024 पर्यंत काय होणार हे फक्त दोनच माणसं ठरवतील, एक म्हणजे नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि दुसरे अमित शाह (Amit Shah) . या दोघांना वाटलं की या राज्यात कमी आमदार येत आहेत तर त्या राज्यातून राजकीय पक्ष संपवण्याची प्रक्रिया सुरु होईल," असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. एबीपी माझाच्या माझा महाकट्टा (Majha Katta) या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते. 

'...तेव्हा राजकीय पक्ष संपवण्याची प्रक्रिया सुरु होईल'

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 2024 पर्यंत काय होणार हे फक्त दोनच माणसं ठरवतील, एक म्हणजे नरेंद्र मोदी आणि दुसरे अमित शाह. या दोघांना वाटलं की या राज्यात कमी आमदार येत आहेत तर त्या राज्यातून राजकीय पक्ष संपवण्याची प्रक्रिया सुरु होईल. कोल्हापूरला असताना अमित शाह यांनी सांगितलं की 48 पैकी 48 जागा घेणार. हे त्यांचं राजकीय वक्तव्य नव्हतं. ते कोणतंही वक्तव्य करायचं म्हणून करत नाहीत. त्यामागे काय मिळवायचं, कसं मिळवायचं हे ठरलेलं आहे. त्यामुळे त्याचं वक्तव्य हलक्यात घ्यायला नको. महाराष्ट्रातली स्ट्रॅटेजी त्यांनी सुरु केली आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

'जातीअंताचा लढा हा 15-20 वर्षात डायल्यूट होणारा विषय'

जातीअंताबाबत बाबासाहेब आणि महात्मा फुले यांनी सुरु केलेली प्रक्रिया आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. येत्या 15-20 वर्षात डायल्यूट होऊन जाणारा हा विषय असेल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

'आरक्षण हे विकासात्मक आहे असा कोणी विचार करु नये'

आरक्षणाचा उपयोग होतो की राजकारण होतं याबाबत विचारलं असता आंबेडकर म्हणाले की, "आरक्षण हे राहणार. आरक्षणाच्या मुद्द्याकडे ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं पाहिजे. शिवाजी महाराजांशिवाय इतर कोणीही आरक्षणाला त्यांच्या राज्यव्यवस्थेत जागाच दिली नाही. देशाचा गुलामीचा इतिहास पाहिला तर असे प्रसंग सापडतात की बाहेरच्यांनी आपल्याला हरवण्यापेक्षा आतल्यांनी माहिती दिल्यामुळे आपण हरलो. याला सामाजिक अर्थ आहे. तुम्ही जर आम्हाला विचारत नसाल तर राज्य कोणाचं आहे याच्याशी संबंध नाही. आरक्षण हे विकासात्मक आहे असा कोणी विचार करु नये, असं माझं म्हणणं आहे. आरक्षण हे व्यवस्थेमध्ये शाश्वतपणा यावा म्हणून तुमचाही प्रतिनिधी आहे, एवढ्यापुरतंच मर्यादित आहे. 100 टक्के जरी आरक्षण दिलं तरी प्रत्येकाला शाश्वत करु शकतो असं नाही."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

EVM Vehicle Attack Nagpur : अधिकाऱ्यांच्या कारवर दगडफेक!EVM घेऊन जाणाऱ्या कारवर हल्लाMaharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget