ABP C voter opinion poll Mahayuti - राज्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू असून महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) अनेक दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. तर, काँग्रेसकडूनही राहुल गांधींसह (Rahul Gandhi) प्रियंका गांधी, मल्लिकार्जून खर्गेंसह अनेक मान्यवर प्रचाराच्या रणधुमाळीत दिसून येतात. त्यामुळे, राज्यातील महायुती विरुद्ध महाविकास आघाडीची लढत रंगतदार होत आहे. भाजपाकडून 45 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, आम्हालाच घवघवीत यश मिळेल, असा विश्वास महाविकास आघाडीला आहे. त्यामुळे, लोकसभा (Loksabha Election 2024) निवडणुकांचा निकाल काय लागणार, याची उत्कंठा सर्वांनाच आहे. त्यातच, मतदानपूर्व सर्वेक्षणातून महाविकास आघाडीचे 18 जागांवर उमेदवार विजयी होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे, महायुतीची मोठी पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळू शकते. 


महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 18 मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळत असल्याचे दिसून येते. महायुतीला 30 जागांवर विजय मिळत असून वंचित बहुजन आघाडीला पुन्हा एकदा भोपळाच असल्याचं अंदाज आहे. एबीपी सी-व्होटरच्या सर्वेक्षणानुसार अजित पवारांचाही सुफडा साफ होणार आहे. कारण, ज्या 4 जागा अजित पवारांना जागावाटपातून मिळाल्या आहेत, तिथे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज आहे. महाविकास आघाडीत 22 जागांवर भाजपा, शिंदेंच्या शिवसेनेला 9 ते 10 जागा मिळू शकतात. तर, अजित पवारांचे खातेही उघडणार नसल्याचं सर्वेक्षणात दिसून येत आहे. सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर येथील जागांवर महाविकास आघाडीसाठी धक्का देणार निकाल दिसू शकतो.  


या 18 जागांवर महाविकास आघाडीला यश


अहमदनगर, औरंगाबाद, बारामती, भिवंडी, बुलढाणा, गडचिरोली, हातकणंगले, हिंगोली, माढा, नांदेड, नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी, रायगड, सातारा, शिर्डी, शिरुर, यवतमाळ-वाशिम या 18 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळणार असल्याचे दिसून येते. तर अहमदनगरमध्ये निलेश लंके आघाडीवर राहतील, तर सांगलीत चंद्रहार पाटील यांना धक्का बसेल, असा अंदाज आहे.


एबीपी- सी वोटर सर्व्हेचा अंदाज काय? 


महायुती = 30


महाविकास आघाडी = 18 
-----------
एकूण = 48 


कोणत्या पक्षाला किती जागा? 
भाजप = 21/22
शिवसेना (एकनाथ शिंदे) = 9/10
राष्ट्रवादी (अजित पवार ) = 00
शिवसेना (उद्धव ठाकरे) = 9
राष्ट्रवादी (शरद पवार) = 5 
काँग्रेस = 3
-----------
एकूण = 48


(नोट : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचार 17 एप्रिल रोजी संपणार आहे. त्याआधी ABP न्यूजसाठी सी व्होटरनं देशभरात लोकांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सी व्होटरनं एबीपी न्यूजसाठी 543 जागांवरील ओपिनियन पोल घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांचाही समावेश आहे. प्रकाशित करणाऱ्यात आलेल्या सर्व्हेमध्ये फक्त अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये अंतिम निकालावेळी म्हणजेच 4 जून रोजी बदल होऊ शकतो. ओपिनियन पोलच्या माध्यामातून फक्त लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.)


इतर महत्त्वाच्या बातम्या


ABP C-Voter Survey : महाराष्ट्रात महायुतीला 'दे धक्का', दिग्गज अडचणीत; राज्यातील या 30 जागांवर उमेदवार आघाडीवर!