Lok Sabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) पडघम केव्हाच वाजले असून या निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता पक्षातील दिग्गज नेतेही प्रत्यक्ष मैदानात उतरत जाहीर सभांमधून अखेरचा 'मास्टर स्ट्रोक' मारण्याच्या तयारीत आहे. अशातच सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीत अमरावती (Amravati) या मतदारसंघाची चांगलीच चर्चा होत आहे. भाजपने (BJP) येथे विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना तिकीट दिले आहे. मात्र राणा यांच्या उमेदवीला महायुतीचाच (Mahayuti) भाग असलेल्या अनेक घटकपक्षांनी विरोध केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी थेट आपला उमेदवार उतरवत भाजपच्या उमेदवार नवनीत राणांच्या विरोधात शड्डू ठोकलाय. त्यामुळे महायुतीमध्ये नवनीत राणांना अंतर्गत विरोध होत असताना त्यात आता राजू शेट्टींच्या (Raju Shetti) स्वाभिमानी पक्षानेही त्यात उडी घेतली आहे. 


अमरावतीत प्रहारची ताकद वाढणार


अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या विरोधात आपला उमेदवार देत थेट नवनीत राणांच्या विरोधात दंड थोपटले आहे. आमरावतीच्या जागेवर बच्चू कडूंनी ठाकरे गटाते नेते दिनेश बुब (Dinesh Bub) यांनी प्रहारकडून उमेदवारी देत खासदार नवनीत राणांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अशातच आता शेतकरी नेते राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाने अमरावतीचे प्रहारचे उमेदवार  दिनेश बुब यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अमरावतीत प्रहारची ताकद वाढणार असून नवनीत राणांच्या विरोधात आता राजू शेट्टींनीही  दंड थोपटले असल्याचे बोलले जात आहे. 


नवनीत राणांचे डिपॉझिट जप्त करू - बच्चू कडू


एकीकडे अमरावतीची जागेसाठी महायुतीत उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच नवनीत राणांना नावाला विरोध होत होता. मात्र हा विरोध झुगारून भाजपकडून नवनीत राणांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र त्यानंतर देखील राणांना होणार विरोध लक्षात घेता या जागेवर भाजपला विजयासाठी फार संघर्ष कारवा लागणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्याने नवनीत राणांच्या विरोधात आणखी एक आव्हान उभे राहिले आहे. या लोकसभा निवडणुकीत आमदार बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामधील वाद वेळोवेळी उफाळून आला आहे.


परिणामी राणांचा आपण  दोन लाखाने पराभव करू, वेळ आली तर त्यांचं डिपॉझिट जप्त करू असं वक्तव्य करत बच्चू कडूंनी ही निवडणूक जरा जास्तच गांभीर्याने घेतल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे नवनीत राणांसाठी भाजपनेही आपली कंबर कसली असून राणांच्या प्रचारार्थ आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तीमुळे मतदार आता नेमकं कोणाला कौल देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.   


इतर महत्वाच्या बातम्या