एक्स्प्लोर

राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'

मिहीर कोटेचांविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून आमदार मिहीर कोटेचा यांच्या राजीनाम्याची मागणी करत शिवसेना ठाकरे गटाकडून मुलुंडमध्ये स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात आलं आहे.

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात आज केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा होत आहे. कारण, एकीकडे गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असून दुसरीकडे गणेशोत्सवात डीजे वाजवण्यावरुन वाद समोर येत आहेत. त्यातच, गणेशोत्सव (Ganeshotsav) येत आहे, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील. केवळ महाराष्ट्रात नाही म्हणत मी, देशात दंगली घडवल्या जातील, जेणेकरून तुम्ही त्यात अडकले पाहिजे, तुमचं इतर गोष्टीकडं दुर्लक्ष झालं पाहिजे, असे वक्तव्य राज यांनी केले. आता, राज ठाकरेंच्या वक्तव्याशी पुतण्या आमदार आदित्य ठाकरेंनी सहमती दर्शवली आहे, तसेच उदाहरण देत भाजपला लक्ष्यही केलं.

मुंबईच्या मुलुंड पूर्व परिसरामध्ये भाजप आमदार मिहीर कोटेचांविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून आमदार मिहीर कोटेचा यांच्या राजीनाम्याची मागणी करत शिवसेना ठाकरे गटाकडून मुलुंडमध्ये स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात आलं आहे. या स्वाक्षरी अभियानामध्ये युवासेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी सहभागी होत, मिहीर कोटेचांचा व्हिडिओ दाखवला. लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून, कशाप्रकारे येथील मैदानं हडपण्याचा डाव असल्याचं आदित्य यांनी सांगितलं. तसेच, राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, आदित्य यांनीही काकांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय. 

मी आमच्या तिकडच्या मुलांना भेटायला जेव्हा रात्री लालबागला गेलो होतो, सगळ्यांकडून जे काही कळते ते असं आहे, कुठेतरी षडयंत्र दिसत आहे, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंच्या मताशी एकप्रकारे सहमती दर्शवली आहे. हे जे जेन झी एकत्र आली आहे, जात पात धर्म प्रांत सगळे बाजूला ठेवून देश एकत्र आला. कुठेतरी भाजपच्या विरोधात देश एकत्र आला आहे. त्यामुळे, दंगली घडवून त्यांना हा धार्मिक वाद निर्माण करायचा आहे, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले.  

महिर कोटेचांविरुद्ध स्वाक्षरी मोहीम

मिहीर कोटेचा सरकारच्या आरक्षित भूखंडावर, पेट्रोल पंप आणि डम्पिंग ग्राउंडवर गोल्फ कोर्स करत आहेत. त्यामुळे, आजपासून आमची मोहीम सुरू झाली आहे, मुंबईमध्ये जिथे जिथे भाजप मोकळ्या जागा ढापत आहे. आपण पाहिलं असाल बांद्रामध्ये आम्ही नेव्हिल डिसोजा ग्राउंड वाचवण्यासाठी रेड कार्ड आंदोलन केला होतं, आज इथे मुलुंडमध्ये मागच्या दोन आठवडापूर्वी मी आलो होतो. पेट्रोल पंप आहे, त्याच्या दुसऱ्या बाजूला स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे. तरी देखील भाजपकडून दोन्ही जागा पेट्रोल पंपच्या नावाखाली ढापल्या जात आहेत, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. आजपासून आम्ही स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे, खोटेचा याचा राजीनामा घेण्यासाठी. आमदार मिहीर कोटेचा खोटे बोलतात, लोकांसमोर एवढं खोटे ते बोलले आहेत. मी आज लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून एव्हिडन्स दाखवलं, त्यात कोटेजा किती खोटं बोलत आहेत, असेही आदित्य यांनी म्हटले.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की, "आता गणपती येतील. 14 तारखेला गणपती येतील. मला सर्वाधिक भीती आहे की, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील. केवळ महाराष्ट्रात नाही म्हणत मी, देशात दंगली घडवल्या जातील, जेणेकरून तुम्ही त्यात अडकले पाहिजे, तुमचं इतर गोष्टीकडं दुर्लक्ष झालं पाहिजे. आताच मुंबईत त्याची झलक पाहिली तुम्ही. एक दोन घटना घडल्या, ही सुरुवात आहे. जो सुजाण हिंदू आहे. जो सुजाण मुस्लिम आहे. दोघांनाही सांगायचंय की सतर्क राहा. आपल्या नावाने, त्यांच्या नावाने यामध्ये कुणीतरी घुसवतील आणि दंगली घडवतील. हकनाक आपली पोरं जातील, त्यांची पोरं जातील. तिकडेच लक्ष जाईल तुमचं. एक दुसऱ्याचा दुस्वास करणे त्यात तुम्हाला गुंतवून ठेवणे, मूळ परिस्थितीकडे दुर्लक्ष करायला लावणे इतकाच कार्यक्रम आता सुरू आहे. आता देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे.” असे त्यांनी म्हटले. 

हेही वाचा

गणपतीत दंगली घडवल्या जातील, राज ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर महंत सुधीरदास पुजारींचा पलटवार; म्हणाले...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
Embed widget