Parbhani News : खासदार संजय जाधव यांच्या गाडीला अपघात, दोन गाड्यांची समोरा समोर धडक
Parbhani News Update : परभणीचे शिवसेनेचे (Shiv sena) खासदार संजय जाधव ( sanjay jadhav) यांच्या गाडीला अपघात झालाय. सुदैवाने यात त्यांना कुठलीही इजा झालेली नाही.
![Parbhani News : खासदार संजय जाधव यांच्या गाडीला अपघात, दोन गाड्यांची समोरा समोर धडक shiv sena parbhani mp sanjay jadhav car accident Parbhani News : खासदार संजय जाधव यांच्या गाडीला अपघात, दोन गाड्यांची समोरा समोर धडक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/23/eaab8dbdda905245a5a821ab34b8402f1663928225528328_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Parbhani News Update : परभणीचे शिवसेना (Shiv sena) खासदार संजय जाधव ( sanjay jadhav) यांच्या गाडीला अपघात झालाय. सुदैवाने यात त्यांना कुठलीही इजा झालेली नाही. मात्र अपघातग्रस्त दुसऱ्या गाडीतील एक जण एक जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीसाठी जात असताना संजय जाधव यांच्या गाडीला हा अपघात झालाय.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज नवरात्री निमित्ताने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी खासदार संजय जाधव जात असताना जिल्हाधीकारी कार्यालयातील धोकादायक झालेल्या वळणावर खासदार संजय जाधव यांची गाडी आणि राज्य तलाठी महासंघाचे पदाधिकारी राजू काजे यांची गाडीची समोरा समोर धडक झाली. यात संजय जाधव यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने त्यांना यात कुठलीही इजा झालेली नाही. मात्र तलाठी महासंघचे पदाधिकारी राजू काजे हे या अपघातात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, हा अपघात नेमका कशाने झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जिल्हाधिकारी कार्यालयातील वळण रास्ता हा अत्यंत धोकादायक झाला असून इथे नेहमी अपघात होत आहेत.
महत्वाच्या बातम्या
'गृहमंत्रीपद पाहिजे होतं पण वरिष्ठांनी...'; अजित पवारांनी मनातली खदखद स्पष्टच बोलून दाखवली
Shrikant Shinde : मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत मुलाकडे कारभार, श्रीकांत शिंदेंचा फोटो शेअर करत राष्ट्रवादीचा आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)