Parbhani Crime News : समाज शिकला सुशिक्षित झाला, महिल्या कितीही मोठ्या पदावर असल्या तरी त्यांच्यावर होणारे अत्याचारांची संख्या मात्र कमी होत नसल्याचं चित्र आहे. दरम्यान अशीच एक धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील पालम येथील घडली. जेथे विवाहित डॉक्टर महिलेने पतीसह सासरच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. पतीसह सासरच्या 5 जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णालय बांधण्यासाठी माहेरहून एक कोटी रुपये आणून दे असा तगादा मागे लावला. त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या डॉक्टर पतीसह सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून विवाहित डॉक्टर महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना परभणीच्या पालममध्ये घडली. याप्रकरणी डॉक्टर पतीसह इतर 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालम शहरातील लोहा रोड भागात राहणाऱ्या डॉ. प्रियांका तिचा विवाह 2022 मध्ये बीड येथील डॉ. निलेश व्हरकटे यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी डॉ. प्रियांकाला त्यांचे पती डॉ. निलेश व्हरकटे यांच्याकडून रुग्णालय बांधण्यासाठी एक कोटी रुपये माहेरकडून आणण्याची मागणी केली होती. या पैश्यांसाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू करण्यात आला.
शेवटी डॉ. प्रियांका या छळाला वैतागल्या होत्या. मागच्या काही दिवसांपासून ती माहेरी राहू लागली. तरीही तिच्या सासरच्या मंडळींकडून तिला फोनवर पैश्यांची मागणी करून सातत्याने त्रास दिला जात होता, त्यामुळे तिने गळफास लावून घेत आपली जीवन संपवले. या प्रकरणी पालम पोलिसांत डॉ. प्रियंकाच्या कुटुंबाकडून देण्यात आलेल्या फिर्यादीवरून तिचे पती.डॉ निलेश व्हरकटे, राम व्हरकटे, सुनीता व्हरकटे, तेजस व्हरकटे, तनया व्हरकटे यांच्या विरोधात पालम पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
हे ही वाचा -
Mumbai News: अंधेरीच्या लोखंडवाला परिसरातील इमारतीला मोठी आग; एका घरातील तिघांचा आगीत होरपळून मृत्यू