Parbhani News : परभणी विधानसभा मतदारसंघात (Parbhani Assembly Constituency) महायुतीमध्ये (Mahayuti) जागेवरून मोठा कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे. ही जागा शिवसेनेला दिली तर त्यांचं काम करणार नसल्याचा पवित्रा भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांनी घेतला. तर दुसरीकडे कुणी कितीही विरोध केला तरीही जागा शिवसेनेचीच आहे. परभणी हा शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला आहे आणि ही जागा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडेच राहील, आम्ही या नाराज सर्व पदाधिकाऱ्यांची समजूत काढू आणि त्यांना सोबत घेऊन काम करू अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता परभणीत (Parbhani News) राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र आहे.  


दोन दिवसांपूर्वी भाजपच्या सर्व नेत्यांनी एकत्र येत परभणीची जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला (Shiv Sena Shinde Group) आणि पाथरीची (Pathari) जागा ही भाजपला सोडण्याची मागणी करत परभणीची जागा भाजपला सोडावी अन्यथा शिवसेनेचा काम न करण्याचा निर्धार केला होता. त्याच अनुषंगाने भाजपचे नेते मुंबईला दाखल झालेले आहेत. वरिष्ठांना बोलून ही जागा भाजपला सोडण्याची मागणी केली जाणार आहे. 


शिवसेना परभणीच्या जागेवर ठाम


मात्र शिवसेनेचे नेते आप्पा वावरे यांनी स्पष्ट केले की, परभणीची जागा शिवसेनेचीच आहे आणि कुठल्याही परिस्थितीत शिवसेना धनुष्यबाणावरच ही निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील हा वाद वाढण्याची शक्यता आहे. आता परभणीची जागा महायुतीत नेमकी कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


आज निवडणुकीची घोषणा


दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission) महाराष्ट्र आणि झारखंड (Maharashtra Vidhansabha Election 2024) या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. त्यामुळे आजच विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात आचारसंहिता लागणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या 12 पैकी 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागा रखडल्या? अजित पवार म्हणाले...


विधानसभेबरोबर महाराष्ट्रात लोकसभेची पोटनिवडणूकही लागणार? नांदेडची वसंत चव्हाणांची गादी कोण चालवणार?