पुणे: पुण्यातील बोपदेव घाटात काही दिवसांपुर्वी फिरण्यासाठी गेलेल्या तरूण, तरूणीला मारहाण करून त्यांच्याजवळ असलेल्या मौल्यवान वस्तू लुटून तरूणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींनी आपला गुन्हा लपवण्यासाठी काय काय केलं ते समोर येत आहे. तर हा गुन्हा करण्यापुर्वी आरोपींनी दारू आणि गांजाचे सेवन केल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यांनी या गुन्ह्यानंतर आपले मोबाईल फोन देखील बंद करून ठेवले होते. आरोपींनी त्यांचे मोबाइल फोन फ्लाईट मोडवर ठेवल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. सामूहिक अत्याचार प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पसार झालेल्या तिसऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. (Bopdev Ghat Incident)


मोठ्या तपासानंतर दोन आरोपी ताब्यात


अख्तर शेख (वय 27, रा. नागपूर), चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय 20, रा. डिंडोरी, रा. मध्यप्रदेश) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याजवळ असलेल्या बोपदेव घाट परिसरात मित्रासोबत फिरायला आलेल्या तरुणीला आणि मित्राला कोयत्याचा धाक दाखवून मौल्यवान वस्तू लुटून तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना 3 ऑगस्ट रोजी घडली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला. आरोपींचा शोधण्यासाठी पोलिसांची 60 पथकं तयार करण्यात आली. अख्तर शेखला सोमवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून ताब्यात घेण्यात आले. कनोजियाला बोपदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या येवलेवाडीतून ताब्यात घेण्यात आले होते.


या प्रकरणातील आरोपी शेखविरुद्ध आधीच पुणे ग्रामीण, नांदेड या ठिकाणी नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. वेगवेगळ्या साथीदारांसोबत त्याने अनेक गुन्हे केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 3 ऑगस्ट रोजी शेख, कनोजिया आणि पसार असलेल्या साथीदाराने दारु प्यायली. त्यानंतर गांजा ओढला. बोरदेव घाटात आलेल्या तरूण- तरूणीला धाक दाखवत मौल्यावान वस्तू घेतल्या नंतर शेखने तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी अत्याचार केले, ही घटना न सांगण्याची धमकी देखील त्यांनी दिली. बोपदेव घाटात गुन्हा करण्यासाठी जाण्याआधी त्यांनी त्यांचे फोन फ्लाईट मोडवर टाकल्याची माहिती आहे. याप्रकरणातील आरोपी शेख हा विवाहित असून, त्याची पत्नी नागपूरमध्ये राहते. 


गुन्हा केल्यानंतर पुन्हा तीन दिवस पुण्यात वास्तव्य


सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचा पोलीस कसून शोध घेत होते. तर हा गुन्हा केल्यानंतर आरोपी तीन दिवस पुण्यात फिरत असल्याची माहिती आहे. 7 ऑक्टोबर ते भेटले. त्यानंतर शेख नागपूरला गेला. तर त्याचा दुसरा साथीदार चंद्रकुमार कनोजियाला 11 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. याप्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी कनोजिया याला चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.