Mumbai News मुंबई :  मुंबईच्या अंधेरीमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अंधेरीच्या पश्चिमेत लोखंडवाला परिसरात असलेल्या रिया पॅलेस या इमारतीला लागली मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आज,16 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 च्या सुमारास रिया पॅलेस इमारतीच्या दहावा मजल्यावर एका घरामध्ये ही मोठी आग लागली. क्षणात या आगीने रौद्ररूप धरण केलं. परिणामी या आगीमध्ये घरात असलेले दोन वयस्कर नागरिक आणि एक नोकरचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


एका घरात तिघांचा होरपळून मृत्यू


आगीचा माहिती मिळताच अग्निशमन दलाचा 5 गाडा घटनास्थळ दाखल होऊन तब्बल एका तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले आहेत.
चंद्रकांत सोनी (वय 76 वर्ष) कांता सोनी (वय 71 वर्ष) आणि नोकर रवी (वय 33 वर्ष) असे या घटनेत तिघांचा आगीमध्ये जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगीचा माहिती मिळताच अग्निशमन दलाचा 5 गाडा घटनास्थळ दाखल होऊन तब्बल एका तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले आहेत. सध्या फायर कूलिंग चे काम अग्निशमन दलाचा जवानांकडून सुरू आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र पहाटे लागलेल्या या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  


भाजपच्या माजी खासदाराच्या पुतण्याची आत्महत्या


भाजपचे माजी खासदार संगमलाल गुप्ता यांच्या पुतण्याने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सागर रामकुमार गुप्ता (23 वर्षे) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अंधेरी पूर्वेकडील हरिदर्शन इमारतीच्या टेरेसवरून त्याने उडी मारून आत्महत्या केली. अंधेरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


सागर गुप्ता कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयाचा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही. सागर गुप्ताने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत. 


अंधेरी पोलीस ठाण्याच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सागर रामकुमार गुप्ता हा उत्तर प्रदेशचे माजी खासदार संगमलाल गुप्ता यांचा पुतण्या आहे. सागर हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून तो अंधेरी (पूर्व) येथील अंबुजवाडी भागात असलेल्या हरीदर्शन भवनच्या सातव्या मजल्यावर राहत होता. सागरची कोणतीही सुसाइड नोट सापडली नसून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सागर गुप्ता डिप्रेशनमध्ये होता की त्यामागे आणखी काही कारण होतं याचा तपास पोलिस करत आहेत.  या प्रकरणी पोलिस सागर गुप्ताच्या मित्रांची आणि त्याच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची चौकशी करणार आहेत.


 हे ही वाचा