Palghar : रानमेवा व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय, आदिवासी महिलांचा सक्षम होण्याचा प्रयत्न
Ranmeva : रानमेवा, भाजीपाला, रानकंद आणि फळे विक्रीतून ग्रामीण भागातील आदिवासी महिलांनी स्वयंरोजगाराच्या संधी शोधत सक्षम बनण्याचा प्रयत्न सुरू केला.
Palghar Ranmeva : रानमेवा, भाजीपाला, रानकंद आणि फळे विक्रीतून ग्रामीण भागातील आदिवासी महिलांनी स्वयंरोजगाराच्या संधी शोधत सक्षम बनण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने या महिलांना स्वयं रोजगाराची दिशा सापडली आहे.
ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबांना रोजगार प्राप्त होत असला तरी कुटुंब चालवणे जिकरीचे जात होते. हे लक्षात घेत कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा यासाठी या कुटुंबातील महिलांनी स्वयंरोगराच्या संधी शोधण्यास सुरुवात केली. जंगलातून निघणारे खाण्यालायक विविध प्रकारचा रानमेवा व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय अनेक महिलांनी सुरू केला. या विक्रीतून एक महिला दिवसाकाठी पाचशे ते हजार रुपयांची उलाढाल करतात. पहाटे घरातील कामे आटोपून कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी या महिला धडपड करताना दिसत आहेत. कंद, अळू पाने, बांबूचे शिंब, आळंबी, कंटोळी, हिरवी चहा, केळीची फुले, दुधी, गावठी हिरवी सालीचे लिंबू, काकड्या, पेंढरी असा विविध प्रकारचा रानमेवा व सेंद्रिय भाजीपाला ग्राहकांना आकर्षित करीत असतो. वाडा तालुकातल्या कुडूस कंचाडखिंडीसह, मुंबई अहमदाबाद महामार्गावर चिल्हार फाटा, मस्तान नाका, टेन नाका, विक्रमगड -जव्हार रस्ता, मनोर-पालघर मार्ग आदी ठिकाणी वाहने थांबवून ग्राहक हा रानमेवा व सेंद्रिय भाजीपाला खरेदी करतायत.
जंगलातून निघणारे खाण्यालायक विविध प्रकारचा रानमेवा व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय अनेक महिलांनी सुरू केला. या विक्रीतून एक महिला दिवसाकाठी पाचशे ते हजार रुपयांची उलाढाल करतात. पहाटे घरातील कामे आटोपून कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी या महिला धडपड करताना दिसत आहेत. कंद, अळू पाने, बांबूचे शिंब, आळंबी, कंटोळी,हिरवी चहा, केळीची फुले, दुधी, गावठी हिरवी सालीचे लिंबू, काकड्या,पेंढरी असा विविध प्रकारचा रानमेवा व सेंद्रिय भाजीपाला ग्राहकांना आकर्षित करीत असतो. वाडा तालुकातल्या कुडूस कंचाडखिंडीसह, मुंबई अहमदाबाद महामार्गावर चिल्हार फाटा, मस्तान नाका, टेन नाका,विक्रमगड -जव्हार रस्ता, मनोर-पालघर मार्ग आदी ठिकाणी वाहने थांबवून ग्राहक हा रानमेवा व सेंद्रिय भाजीपाला खरेदी करतात.