एक्स्प्लोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पालघरमध्ये, 76 हजार कोटींच्या वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमीपूजन करणार

Vadhavan Port : पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असून पालघरमध्ये सुमारे 76,000 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून 76 हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदल प्रकल्पाचे ते भूमीपूजन करणार आहेत. सकाळी  सुमारे 11 वाजता पंतप्रधान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 'ग्लोबल फिनटेक फेस्ट  2024' ला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पंतप्रधान पालघरमधील सिडको मैदानावर विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च  सुमारे  76,000 कोटी रुपये आहे.  जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार स्थापन करणे हे यामागचे  उद्दिष्ट असून डीप ड्राफ्ट मुळे मोठ्या कंटेनर जहाजांना  तसेच अति-मोठ्या मालवाहू जहाजांना या बंदरांवर थांबा घेता येईल. त्यामुळे देशाच्या व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.

पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ असलेले वाढवण बंदर, भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असेल आणि आंतरराष्ट्रीय नौवहन  मार्गांना थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल,वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी करेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज अशा या बंदरात डीप बर्थ, कार्यक्षम कार्गो हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली असतील. या बंदरामुळे रोजगाराच्या संधीत लक्षणीय वाढ होईल, स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि प्रदेशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला मदत होईल  अशी अपेक्षा आहे. 

वाढवण बंदर प्रकल्पामध्ये शाश्वत विकास पद्धतींचा समावेश करण्यात आला असून  पर्यावरणीय प्रभाव कमी करणे आणि कठोर पर्यावरणीय मानकांचे पालन करण्यावर भर देण्यात आला आहे. हे बंदर कार्यान्वित झाल्यानंतर, भारताची सागरी कनेक्टिव्हिटी वाढेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत होईल.

पंतप्रधान सुमारे 1,560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील ज्याचा उद्देश देशभरातील या क्षेत्राच्या पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढवणे हा आहे.  या उपक्रमांमुळे मत्स्य व्यवसाय क्षेत्रात पाच लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 360 कोटी रुपये खर्चाच्या नॅशनल रोल आउट ऑफ व्हेसल कम्युनिकेशन अँड सपोर्ट सिस्टीमचा म्हणजेच जहाजांच्या दरम्यान संपर्क आणि मदत यंत्रणा उभारण्याचा प्रारंभ करण्यात येईल. या प्रकल्पाअंतर्गत देशातील 13 किनारपट्टीवरील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्यात कार्यरत यांत्रिकी तसेच मोटरबसवलेल्या जहाजांवर टप्प्याटप्प्याने 1 लाख ट्रान्सपाँडर बसवण्यात येणार आहेत. व्हेसल कम्युनिकेशन अँड सपोर्ट सिस्टीम ही इस्रोद्वारे विकसित स्वदेशी तंत्रज्ञान प्रणाली असून मच्छिमारांना समुद्रात असताना दोन्ही बाजूंनी परस्परांशी संपर्क स्थापित करण्यात मदत करेल तसेच बचाव कार्यात मदत करून आपल्या मच्छिमारांची सुरक्षितता देखील सुनिश्चित करेल.

याप्रसंगी, पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणाऱ्या इतर उपक्रमांमध्ये मासेमारी बंदरे आणि एकात्मिक ॲक्वापार्क्सचे विकसन तसेच रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम आणि बायोफ्लॉक यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांचा स्वीकार यांचा समावेश आहे. हे प्रकल्प देशातील विविध राज्यांमध्ये राबवण्यात येणार असून माशांचे उत्पादन वाढवणे, मासेमारी-पश्चात व्यवस्थापन सुधारणे तसेच मत्स्य क्षेत्रात सहभागी असलेल्या लाखो लोकांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण करणे या कार्यांसाठी निर्णायक ठरणाऱ्या पायाभूत सुविधा तसेच उच्च दर्जाची सामग्री पुरवतील.

पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी मासेमारी बंदरे, मासे ठेवण्याची केंद्रे यांचा विकास, अद्यायावतीकरण आणि आधुनिकीकरण तसेच मासळी बाजारांचे बांधकाम यांसह महत्त्वाच्या मत्स्यव्यवसाय संबंधी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी देखील करण्यात येईल.

पंतप्रधानांची मुंबई भेट

मुंबई भेटीदरम्यान पंतप्रधान ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 च्या विशेष सत्राला संबोधित करतील. पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स यांनी संयुक्तपणे या जीएफएफचे आयोजन केले आहे. देशभरातील तसेच जगातील अनेक देशांतून आलेले विविध धोरणकर्ते, नियामक, जेष्ठ बँकिंग तज्ञ, उद्योग क्षेत्रातील अगणी तसेच शिक्षण तज्ञ असे सुमारे 800 वक्ते या परिषदेतील 350 हून अधिक सत्रांना संबोधित करतील. या चर्चेद्वारे फिनटेकविषयक परिदृष्यातील आधुनिक नवोन्मेषांचे देखील दर्शन घडेल. जीएफएफ 2024 मध्ये उद्योगविषयक सखोल जाण आणि सखोल माहिती देणाऱ्या विचारवंतांचे 20 हून अधिक अहवाल आणि श्वेतपत्रिका सादर होणार आहेत.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Afghanistan war : फक्त सरावासाठी 39 निष्पापांना गोळ्या घालून मारले; 'त्या' युद्धातील सैनिकांकडून सेवा पदके परत घेतली जाणार!
फक्त सरावासाठी 39 निष्पापांना गोळ्या घालून मारले; 'त्या' युद्धातील सैनिकांकडून सेवा पदके परत घेतली जाणार!
Manoj Jarange : मराठा समाजाविरोधात डाव, मुख्यमंत्री शिंदेंनी दगाफटका केला तर...; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
Manoj Jarange : मराठा समाजाविरोधात डाव, मुख्यमंत्री शिंदेंनी दगाफटका केला तर...; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
Prithviraj Chavan : वाहतुकीच्या त्रासाने हिंजेवाडीत येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या, आयफोनचं सुद्धा एकही युनिट राज्यात नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
वाहतुकीच्या त्रासाने हिंजेवाडीत येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या, आयफोनचं सुद्धा एकही युनिट राज्यात नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढवली, आधार कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा, नवीन तारीख किती? 
मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढवली, आधार कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा, नवीन तारीख किती? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Dhanorkar Vs Vijay Wadettiwar : वडेट्टीवार - धानोरकर वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठकDevendra Fadnavis on Eknath Khadse : खडसेंबाबत गणेशोत्सवानंतर चर्चेतून निर्णय घेणार : फडणवीसPune Dog Attack : चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला , हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमीJoshi Wadewale Fight Mangaon : जोशी वडेवाल्यांची मुजोरी..गरोदर महिलेला केली मारहाण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Afghanistan war : फक्त सरावासाठी 39 निष्पापांना गोळ्या घालून मारले; 'त्या' युद्धातील सैनिकांकडून सेवा पदके परत घेतली जाणार!
फक्त सरावासाठी 39 निष्पापांना गोळ्या घालून मारले; 'त्या' युद्धातील सैनिकांकडून सेवा पदके परत घेतली जाणार!
Manoj Jarange : मराठा समाजाविरोधात डाव, मुख्यमंत्री शिंदेंनी दगाफटका केला तर...; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
Manoj Jarange : मराठा समाजाविरोधात डाव, मुख्यमंत्री शिंदेंनी दगाफटका केला तर...; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
Prithviraj Chavan : वाहतुकीच्या त्रासाने हिंजेवाडीत येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या, आयफोनचं सुद्धा एकही युनिट राज्यात नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
वाहतुकीच्या त्रासाने हिंजेवाडीत येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या, आयफोनचं सुद्धा एकही युनिट राज्यात नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढवली, आधार कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा, नवीन तारीख किती? 
मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढवली, आधार कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा, नवीन तारीख किती? 
Devendra Fadnavis: एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये गणपतीनंतर पक्षप्रवेश , देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाचे संकेत
एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये गणपतीनंतर पक्षप्रवेश , देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाचे संकेत
विदर्भात मविआचं ठरलं! 62 विधानसभांपैकी 29 जागांचं गणित सुटलं, 'या' मतदारसंघांवर एकाच पक्षाचा दावा
विदर्भात मविआचं ठरलं! 62 विधानसभांपैकी 29 जागांचं गणित सुटलं, 'या' मतदारसंघांवर एकाच पक्षाचा दावा
Dharashiv: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, धाराशिवचा 'हा' नेता शिंदे गटात जाणार, शेकडोंच्या  लवाजम्यासह पक्षप्रवेशासाठी रवाना
ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, धाराशिवचा 'हा' नेता शिंदे गटात जाणार, शेकडोंच्या लवाजम्यासह पक्षप्रवेशासाठी रवाना
Sunita Williams : घरवापसी होत नसताना थेट अंतराळातून सुनीता विल्यम्स यांची पत्रकार परिषद; अमेरिकन निवडणुकीसाठी घेतला महत्वाचा निर्णय!
घरवापसी होत नसताना थेट अंतराळातून सुनीता विल्यम्स यांची पत्रकार परिषद; अमेरिकन निवडणुकीसाठी घेतला महत्वाचा निर्णय!
Embed widget