'साहेब, नवऱ्याला सोडून जाऊ तरी कसं..' दीड वर्षांनी व्हिसा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच आली सासरी; आता पती शिवाय पाकिस्तानला परतण्याची ओढवली नामुष्की
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परतण्यास सांगितले आहे. या आदेशामुळे जैसलमेरमध्ये लग्न झालेल्या दोन पाकिस्तानी वधूंचे स्वप्न भंगले आहे.

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) निष्पाप 26 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारत सरकारने सर्व पाकिस्तानी (Pakistan) नागरिकांना त्यांच्या देशात परतण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे जैसलमेरमध्ये लग्न झालेल्या दोन पाकिस्तानी वधूंच्या स्वप्नांचा चुराडा झालाय. खरं तर, सचुल आणि कर्मा खातून, जे फक्त 13 दिवसांपूर्वीच त्यांच्या सासरच्या घरी आले होते. मात्र मधल्या काळात परिस्थिती पूर्णता: बदलली असून सरकारने पाकिस्तानच्या विरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे त्यांना आता पाकिस्तानला परतण्यास भाग पाडले जात आहे.
दरम्यान आज तकच्या वृत्तानुसार, 2023 मध्ये, सालेह मोहम्मद आणि मुश्ताक अली हे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील घोटकी येथे त्यांच्या नातेवाईकांना भेटले. या काळात त्याला 21 वर्षांची कर्मा खातून आणि 22 वर्षांची सचुल आवडली.
ऑगस्ट 2023 मध्ये झालं होतं लग्न
कुटुंबियांची सहमतीनंतर दोन्ही मुलींचे लग्न अगस्त 2023 मध्ये झालं होतं. मात्र लग्नानंतर दोघी नववधूला भारतचा वीजा मिळाला नाही, त्यामुळे दोन्ही नव विवाहित वर पर भारतात परतले. सुमारे दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, अखेर एप्रिल २०२५ मध्ये व्हिसा जारी झाला आणि ११ एप्रिल रोजी दोन्ही वधू जैसलमेरमधील त्यांच्या सासरच्या घरी पोहोचल्या. त्यानंतर दोन्ही वधू निराश झालेत आणि त्यांनी सरकारला आवाहन केले आहे की त्यांना त्यांचे कुटुंब आणि पती सोडून परत जायचे नाही. वधूचे सासरे हाजी अब्दुल्ला यांनी सांगितले की, त्यांनी दोन्ही वधू भारतात आल्यानंतर लगेचच दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला होता, परंतु दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही वधूंना पाकिस्तानला परत पाठवण्याचा दबाव आहे.
पाकिस्तानला परतण्याचा आजचा शेवटचा दिवस
भारत सरकारच्या सूचनेनुसार, व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना आज 27 एप्रिलपर्यंत अटारी सीमेवरून पाकिस्तानात परतणे बंधनकारक आहे. जैसलमेरचे परदेशी नोंदणी अधिकारी विक्रम सिंह भाटी यांच्या मते, आतापर्यंत चार पाकिस्तानी नागरिकांनी पाकिस्तानात परतण्याची परवानगी घेतली आहे, ज्यात या दोन वधूंचा समावेश आहे.
मुस्लीम देशांपैकी इराण आणि युएई यांचाही भारताला उघडपणे पाठिंबा-
पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर नाराजी व्यक्त केली जात असून भारताला पाठिंबा मिळत आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीनने दहशतवादाविरोधात भारताला पाठिंबा दिलाय. तर मुस्लीम देशांपैकी इराण आणि युएई यांनीही भारताला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























