एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack: पाकिस्तान बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीच्या तयारीत; भारताला चिथावणी देण्याचा निष्काळजी प्रयत्न

Pahalgam Terror Attack: भारताला चिथावणी देण्याचा निष्काळजी प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. 

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानची कायमची अद्दल घडवा, अशी मागणी भारतभरातून होत आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया सुरू आहेतच, मात्र दहशतवाद्यांचे आका सीमापार पाकिस्तानात आहेत. त्यांना धडा शिकवण्याची तयारी सुरू झालीय. भारताच्या या भूमिकेनंतर पाकिस्तानला धडकी भरल्याचे दिसून येतंय. या आठवड्यात जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत पाकिस्तान असल्याची माहिती विशेष सूत्रांकडून मिळत आहे. भारताला चिथावणी देण्याचा निष्काळजी प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. 

पाकिस्तान या आठवड्यात जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याची तयारी करत असल्याचे कळतंय. हे पाकचं चिथावणी देण्याचे एक निष्काळजी कृत्य असून ही भारताविरुद्ध अत्यंत धोकादायक मोहीम असल्याचं समजतं. विशेष सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून, पाकिस्तानने बेफिकीरपणे नौदलाचे इशारे दिले आहेत. अरबी समुद्रात सराव वाढवला आहे आणि नियंत्रण रेषेवर सतत युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. अशा अस्थिर परिस्थितीत ही नियोजित क्षेपणास्त्र चाचणी ही उघड चिथावणी आहे आणि भारतासोबत तणाव वाढवण्याचा एक हताश प्रयत्न असल्याचे बोललं जात आहे. 

युद्धभयानं कापलेल्या पाकिस्तानला चीनची मदत-

युद्धभयानं कापलेल्या पाकिस्तानला चीन मदत करत आहे. चीन 40 रणगाड्यांची पहिली खेप कराचीला पाठवणार आहे. सध्या भारताकडं 4 हजार 200, तर पाकिस्तानकडे 2 हजार 600 रणगाडे आहेत. 

पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचाच हात-

पहलगाममधल्या पर्यटकांवरच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचाच हात आहे, हे तेव्हाच लक्षात आले. आता याचे धडधडीत पुरावेसुद्धा समोर आलेत. हल्ल्याचा तपास करणाऱ्या एनआयएच्या प्राथमिक अहवालात मोठा खुलासा समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हल्ल्यामागे पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि लष्कर ए तोयबाचा हात आहे. या हल्ल्याचा कट थेट पाकिस्तानी लष्कर ए तोयबाच्या मुख्य ऑफिसमध्ये शिजल्याची माहिती समोर येत आहे. 

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासची एन्ट्री-

5 फेब्रुवारी 2025 रोजी हमासने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह एका रॅलीत भाग घेतला होता. या रॅलीला 'काश्मीर सॉलिडॅरिटी अँड हमास ऑपरेशन अल-अक्सा फ्लड कॉन्फरन्स' असे नाव देण्यात आले. पहलगाम हल्ल्याच्या नियोजनात सहभागी असलेले दहशतवादी या कार्यक्रमाला उपस्थित होते, अशी माहिती देखील मिळत आहे. या कार्यक्रमात हमासचे प्रतिनिधी डॉ. खालेद अल-कदौमी यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. इतर अनेक पॅलेस्टिनी दहशतवाद्यांसह पाकिस्तान समर्थित जिहादी संघटनांनी त्यात भाग घेतला. यावेळी, व्यासपीठावरून भारताविरुद्ध धमक्या देण्यात आल्या. 

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack मोठी बातमी : पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासची एन्ट्री; धडकी भरवणारा व्हिडीओ, नवं कनेक्शन उघड?

Pahalgam Terror Attack: अमेरिकेने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावले खडेबोल; म्हणाले, आम्ही भारतासोबत, तुम्ही पहलगाम हल्ल्याचा निषेध करा!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget