Pahalgam Terror Attack : काश्मीर खोऱ्यात लष्कराची मोठी कारवाई! पाच दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त; मदत करणारेही रडारवर
Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरूच आहे. पुलवामामध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांची घरे सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केली आहेत.

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारतीय सुरक्षा दलांचे (Indian Army) ऑपरेशन सुरूच आहे. पुलवामामध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांची घरे सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केली आहेत. अलिकडेच, खोऱ्यात सक्रिय असलेल्या आणखी दोन दहशतवाद्यांची घरेही उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जून 2023 मध्ये, लष्कर दहशतवादी एहसान अहमद शेखचे दुमजली घर सुरक्षा दलांनी आयईडीने उडवून दिले. तो पुलवामाच्या (Pulwama) मुर्रानचा रहिवासी आहे. दुसऱ्या एका कारवाईत, शोपियानमधील चोटीपोरा भागात दोन वर्षांपूर्वी लष्करात सामील झालेल्या शाहिद अहमदचे घर उडवून देण्यात आले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर गेल्या 48 तासांत दहशतवाद्यांचे एकूण 6 घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.
दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त
दरम्यान, 25 एप्रिलच्या रात्री, कुलगाममधील क्विमोह येथे सुरक्षा दलांनी 2023मध्ये लष्करात सामील झालेल्या झाकीर घनीचे तिसरे घर उद्ध्वस्त केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून सक्रिय असलेल्या लष्कर दहशतवाद्यांची एकूण 6 घरे आतापर्यंत उडवून देण्यात आली आहेत.
हे आहेत आतंकवादी :
आदिल गोजरी (बिजबेहरा)
आसिफ शेख (त्राल)
अहसान शेख (पुलवामा)
शाहिद कुट्टे (शोपियां)
जाकिर गनी (कुलगाम)
हारिस अहमद (पुलवामा)
सुरक्षा दलांनी शुक्रवारी रात्री (25 एप्रिल) कुलगाममधील क्विमोह येथील झाकीर घनीचे घर उडवून दिले. यानंतर, सुरक्षा दलांनी बिजबेहरा येथील आदिल ठोकरचे घरही आयईडीने उडवून दिले. दरम्यान, 25 एप्रिल रोजी सुरक्षा दलांनी त्रालमधील आसिफ शेखचे घर पाडले. पुलवामा येथील दहशतवाद्यांचे घर उद्ध्वस्त करण्यापूर्वी, अनंतनाग जिल्ह्यातील गोरी भागातील बिजबेहरा येथे असलेल्या पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या स्थानिक दहशतवादी आदिल हुसेन ठोकरच्या घरावर सुरक्षा दलांनी बॉम्बहल्ला केला.
आदिल ठोकरवर दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप
पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेला स्थानिक दहशतवादी आदिल हुसेन ठोकर याचे घर अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथील गोरी भागात सुरक्षा दलांनी उडवून दिले. आदिल ठोकर, ज्याला आदिल गुरी म्हणूनही ओळखले जाते. त्याच्यावर पहलगामच्या बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याची योजना आखण्याचा आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करण्याचा आरोप आहे. जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने त्रालमधील आणखी एका स्थानिक दहशतवादी आसिफ शेखचे घर बुलडोझरने पाडले. दहशतवाद्यांमध्ये दोन स्थानिक लोकही होते. या दोन स्थानिक दहशतवाद्यांची ओळख पटली आहे ती बिजबेहरा येथील आदिल हुसेन ठोकर आणि त्राल येथील आसिफ शेख अशी आहे.
संबंधित बातमी:























