एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack: अटारी-वाघा बॉर्डरवर गर्दी; आतापर्यंत किती पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडला?, आकडेवारी आली समोर

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांनी पुढील 48 तासांत भारत सोडावा, असे निर्देश केंद्र सरकारने दिले होते.

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध पाच मोठे निर्णय घेतले. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांनी पुढील 48 तासांत भारत सोडावा, असे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. तसेच कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारतात प्रवेश मिळणार नाही, असा निर्णयही घेण्यात आला. त्यानंतर एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने देश सोडण्यासाठी 48 तासांची मुदत दिल्यानंतर पंजाबमधील अमृतसरमधील अटारी-वाघा सीमा चेकपोस्ट मार्गाने एकूण 191 पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडला आहे. तर पाकिस्तानला गेलेले एकूण 287 भारतीय नागरिकही मायदेशात परतले असल्याची माहिती समोर आली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराचे जवान अॅक्शन मोडमध्ये-

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराचे जवान अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. काश्मीरच्या बांदिपोरा भागात कुलनार इथे चकमकीत एक दहशतवादी ठार मारण्यात आला. तर दोन सैनिक जखमी झालेत. परिसराला वेढा घालून अजूनही शोध मोहिम सुरू आहे. काश्मीरच्या शोपियान आणि पहलगाममध्ये घरांची झडती सुरू आहे. शेकडो संशयित ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

भारताचे पाकिस्तानला 5 तगडे धक्के-

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारची एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्ताविरोधात 5 मोठे निर्णय घेत 5 तगडे धक्के पाकिस्तानला देण्यात आले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिंधू जल करारावर स्थगिती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द करण्यात येत आहे. तसेच, भारतातील पाकिस्तान दुतावासाच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचा निर्णय या बैठकीत झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानची व्यापाराच्या दृष्टीने कोंडी करण्याची रणनीती भारताने आखली असून आजच्या बैठकीतील निर्णयाचा दूरगामी परिणाम भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर होणार आहे. 

शत्रूनं विचारही केला नसेल असा धडा त्यांना शिकवू- पंतप्रधान मोदी

काश्मीरच्या पहलगाममधला भ्याड हल्ला हा फक्त पर्यटकांवर झालेला हल्ला नव्हता. तर तो देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला हा हल्ला होता. त्यामुळे या हल्ल्याला भारताकडून काय उत्तर दिलं जाणार याची उत्सुकता देशवासियांना आहे. तर हल्ल्याच्या तिसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आश्वस्त केलं. शत्रूनं विचारही केला नसेल असा धडा त्यांना शिकवू असा निर्धार नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. 

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा अन्...; अमित शाह यांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश, हालचालींना वेग

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 June 2026: आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! लक्ष्मी-नारायणाच्या कृपेने सुखाचे दिवस, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! लक्ष्मी-नारायणाच्या कृपेने सुखाचे दिवस, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
सांगली सातारा विधानपरिषद निवडणूक! दोन्ही राजांना विचारात न घेताच निर्णय घेतले जात असावेत, जयंत पाटलांचा टोला
सांगली सातारा विधानपरिषद निवडणूक! दोन्ही राजांना विचारात न घेताच निर्णय घेतले जात असावेत, जयंत पाटलांचा टोला
Hingoli : संतापजनक! हिंगोलीत लाखो रुपये खर्चून आणलेल्या तीन नव्या कोऱ्या शववाहिका धूळ खात; वर्षभरापासून हस्तांतरण प्रलंबित
संतापजनक! हिंगोलीत लाखो रुपये खर्चून आणलेल्या तीन नव्या कोऱ्या शववाहिका धूळ खात; वर्षभरापासून हस्तांतरण प्रलंबित
Dhule Crime : धुळ्यात धक्कादायक प्रकार! शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; तिघांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल
धुळ्यात धक्कादायक प्रकार! शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; तिघांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Financial Freedom : आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
Gold vs US Dollar : आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
Share Market : बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
IND A vs SL A Highlights : टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
Embed widget