एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack: काश्मीरमध्ये सर्वांत मोठी कारवाई; दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात

Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली.

Pahalgam Terror Attack: काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) तपास आता एनआयएकडे देण्यात आला. या हल्ल्याप्रकरणी आता एनआयएनं देखील गुन्हा दाखल केला आहे. एनआयए या प्रकरणाची अधिकृतपणे चौकशी करेल. एनआयएचं एक पथक घटनास्थळी तपास करत आहे. केंद्राच्या आदेशानंतर एनआयएनं दाखल केलेल्या एफआयआरवर चौकशी करण्यात येत आहे. जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर तपास यंत्रणा एनआयएला सहकार्य करत आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन सुरु आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली असून त्यांच्या छुप्या अड्ड्यांवर छापे मारण्यात आले. तसेच घातपाती कारवायांसाठी मदत करणाऱ्या 400 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले. कश्मीरमधील गेल्या दोन दशकांतील ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे.

पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आज शेवटचा दिवस-

भारत सरकारच्या अल्टिमेटमनंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मायदेशी परतण्यासाठी अटारी सीमेवर प्रचंड गर्दी झालीये. भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा आजपासून रद्द केले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा देखील २९ एप्रिलपर्यंतच वैध असतील. व्यवसाय, चित्रपट, पत्रकार, स्थलांतर, परिषद, पर्वतारोहण, विद्यार्थी, अभ्यागत, पर्यटक आणि तीर्थयात्रेसाठी व्हिसा असलेल्यांनी आज भारत सोडावा, असे परराष्ट्र मंत्रालयाचे आदेश आहेत. तर कुठल्याही पाकिस्तानी नागरिकाला नवीन व्हिसा जारी केला जाणार नाही. 

भारताने झेलम नदीमध्ये पाणी सोडले; पाकिस्तानात पूर, आणीबाणी लागू

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केला आहे. यानंतर शनिवारी पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथील झेलम नदीत भारताने पाणी सोडले. झेलम नदीत पाणी सोडल्यामुळे मुझफ्फराबादमध्ये भयंकर पूर आला आहे. यामुळे प्रशासनाने पाण्याची आणीबाणी जाहीर केली आहे. तसेच स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय.

मुस्लीम देशांपैकी इराण आणि युएई यांचाही भारताला उघडपणे पाठिंबा-

पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर नाराजी व्यक्त केली जात असून भारताला पाठिंबा मिळत आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीनने दहशतवादाविरोधात भारताला पाठिंबा दिलाय. तर मुस्लीम देशांपैकी इराण आणि युएई यांनीही भारताला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद बिन नाह्यान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून संवाद साधला आणि पहलगाम हल्ल्याचा निषेध केला.

राज्यासह देशभरातील विविध घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack: बाप रे! महाराष्ट्रात 5023 पाकिस्तानी, 107 जण बेपत्ता, फक्त 51 पाकिस्तान्यांकडे वैध व्हिसा अन् कागदपत्रे

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

सरकारचा मोठा निर्णय, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवारांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
सरकारचा मोठा निर्णय, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवारांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget