एक्स्प्लोर

Nagpur : विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या 'या' कागदपत्रांसाठी नाही स्टॅम्प पेपरची गरज, जिल्हाधिकाऱ्याचे स्पष्टीकरण

विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांसाठी स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञापत्र मागण्यात येते. त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून विद्यार्थ्यांना अनावश्यक त्रास देऊ नका असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

नागपूर: दहावी, बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामुळे विविध कागदपत्रांसाठी महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयात विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रासाठी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा पत्र मागण्यात येते. दुसरीकडे स्टॅम्प पेपर विक्रेत्यांकडून शंभर रुपयांचा स्टॅम्पपेपर 110 ते 120 रुपयात विकण्यात येतो. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी जात प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्काची आवश्यकता नाही, तरी नागरिक मुद्रांक  खरेदी करत आहेत. सर्व विभागांनी संबंधितांना या संदर्भातील सूचना द्याव्यात व त्याचे अनुपालन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निबंधक आर. विमला यांनी  दिले आहे. त्यासोबतच नागरिकांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन केले.

दहावी, बारावी व इतर शैक्षणिक विभागाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना शपथपत्र,आवश्यक जात प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रास 100 रुपयाचे मुद्रांक लावण्याची सवय नागरिकांना असल्याने किंवा संबंधित शासकीय विभागाकडून शपथपत्र व इतर प्रमाणपत्र 100 रुपयांच्या मुद्रांकावर सादर करण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे पालकांना विनाकारण 100 रुपयाचे मुद्रांक खरेदी करणे भाग पडत आहेत. सर्व प्रकरणात जात प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये व न्यायालये यांचे समोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यानुषंगाने नागरिकांनी या प्रकरणासाठी मुद्रांक खरेदी करू नये, असे जिल्हाधिकारी यांनी आदेशित केले आहे. याबाबत विभागातर्फे विशेष जनजागृती केली आहे. त्यासोबतच सर्व विभागांना सूचित करण्यात आले आहे. या बाबत पुन्हा जनजागृती  करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शासकीय विभागांना निर्देश

सर्व विभागांनी सुध्दा या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी  दिल्या. यापुढे शपथपत्र विद्यार्थ्यांना आवश्यक जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र,वास्तव्य प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रासाठी मुद्रांकाची मागणी नागरिकांना करण्यात येवू नये, असे स्पष्ट सूचना त्यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना 100 रुपयांचा मुद्रांक घेण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच वारंवार निर्माण होणाऱ्या अडचणीतून मार्ग काढणे सोयीचे होईल,असे त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 October 2026: आज नवरात्रीचा सहावा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा सहावा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
जर अमेरिका आणि पाकिस्तान युद्ध झालं तर आपण पाकिस्तानसोबत राहावं, कारण ते आपले शेजारी, राजस्थान भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिका- पाकिस्तान युद्ध झाल्यास आपण पाकिस्तानसोबत, ते आपले शेजारी : मदन राठोड
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका, 'पुणे शिक्षक'साठी भाजपच्या विरोधात बंडखोराला पाठिंबा जाहीर
मोठी बातमी! अमरावतीतील उट्टे शिवसेना पुण्यात काढणार, 'पुणे शिक्षक'साठी बंडखोर उमेदवाराला एकनाथ शिंदेंचा पाठिंबा

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget