Nagpur Sports : तुमच्या युवक मंडळांना हवाय क्रीडा साहित्य, झटपट करा अर्ज
क्रीडा साहित्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज 25 जुलैपर्यंत सादर करावे. अधिक माहिती नेहरु युवा केंद्र, कस्तुरबा भवन, बजाजनगर, नागपूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन अथवा मोबाईल क्र. 7015229826 वर संपर्क साधावा.
नागपूर : नेहरु युवा केंद्रातर्फे युवक मंडळाना क्रीडा साहित्य वितरण करण्यात येणार आहे. नेहरु युवा केंद्र नागपूर कार्यालयाशी संलग्नित जिल्हृयातील युवा/युवती मंडळांनी लवकरात लवकर क्रीडा साहित्यासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. नेहरु युवा केंद्रातर्फे दरवर्षी युवक व युवती मंडळांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात येत असते. यावर्षीचे क्रीडा साहित्य लवकरच वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवक मंडळांनी क्रीडा साहित्यासाठी कार्यालयातून विहित नमुन्यातील अर्ज 25 जुलैपर्यंत सादर करावे. अधिक माहितीसाठी नेहरु युवा केंद्र, 349/2, कस्तुरबा भवन, बजाजनगर, नागपूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा किंवा मोबाईल क्र. 7015229826 वर संपर्क साधावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी उदयविर यांनी केले आहे.
आता सीबीएससी शाळांकडून दुप्पट क्रीड स्पर्धा शुल्क नाही
नागपूर : चालू सत्राकरीता राज्य व सि.बी.एस.ई मंडळाच्या शाळेतील खेळाडूंना एकसमान क्रीडा स्पर्धा शुल्क आकारण्यात यावे, निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेच्या अध्यक्ष आर. विमला यांनी दिले. जिल्हा क्रीडा परिषद अधिनस्त दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असते. क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संघ व खेळाडू सहभागी होत असल्यामुळे केवळ शासनाकडून प्राप्त अनुदानामध्ये स्पर्धाचे दर्जेदार आयोजन करणे शक्य होत नाही. यासाठी जिल्हा क्रीडा परिषद कार्यकारी समितीच्या बैठकीत CBSC शाळेकडून राज्य शासनाच्या शाळेच्या तुलनेत दुप्पट स्पर्धा प्रवेश शुल्क आकारण्यात येत होता.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत शुल्क कमी करण्याबाबत प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक विचार करुन CBSE व राज्य शासनाच्या शाळांना एकसमान क्रीडा स्पर्धा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. आगामी जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धासाठी एकसमान क्रीडा शुल्क आकारण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी कळविले आहे.