एक्स्प्लोर

पेशवेकालीन 300 वर्ष जुना बापटवाडा जमिनदोस्त, जाणून घ्या काय आहे इतिहास

Panvel: पनवेल शहरातील ऐतिहासिक वाडे हीदेखील शहराची एक ओळख आहे. कालांतराने या वाड्यांची जागा टोलेजंग इमारती घेत आहेत. यापैकीच एक पेशवेकालीन बापटवाडा पालिकेने जमीनदोस्त केला, धोकादायक असल्याने पालिकेने पोलिसांच्या फौजफाट्यासह जमीनदोस्त केला.

Panvel: पनवेल शहरातील ऐतिहासिक वाडे हीदेखील शहराची एक ओळख आहे. कालांतराने या वाड्यांची जागा टोलेजंग इमारती घेत आहेत. यापैकीच एक पेशवेकालीन बापटवाडा पालिकेने जमीनदोस्त केला, धोकादायक असल्याने पालिकेने पोलिसांच्या फौजफाट्यासह जमीनदोस्त केला. पेशवेकालीन हा वाडा चिमाजी आप्पायांनी वसईच्या स्वारीवेळी पनवेल मध्ये बांधला होता. या वाड्याला जवळपास 300 वर्ष झाली. शहरातील ऐतिहासिक गोकुळाष्टमीचा सण या वाड्यात कित्येक वर्षांपासून साजरा होत होता. सध्याच्या घडीला या वाड्यात 12 भाडेकरू वास्तव्यास होते. मात्र हा वाडा धोकादायक झाल्याने पालिकेने दीड महिन्यापूर्वी भाडेकरूंना नोटिसा बजावून घरे खाली करण्याच्या सूचना केल्या होत्या.

तलावांचे शहरासोबत वाड्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या पनवेल गावात पेशवेकालीन इतिहासाच्या खूना आजही आहेत. शहर होण्यापुर्वी गाव असलेल्या पनवेल शहरात अनेक वाडे होते. विकासाच्या लाटेत हे वाडे जमिनदोस्त होऊन भौगोलिक विस्तारासाठी जमिन अपुरी पडू लागल्यानंतर वाड्यांची जागा उंच इमारतींनी घेतली. परंतू 300 वर्षे जुना असलेल्या पनवेल शहरातील बापटवाड्याची पडझड होवूनही इतिहासाची साक्ष देत उभा होता. दगडमातीचे बांधकाम असलेल्या बापटवाड्यात एकेकाळी एकावेळी शंभर ते सव्वाशे कुटूंब रहात होती. पनवेल शहरात 150 वर्षे जुना धुतपापेश्वर हा आयुर्वेदिक औषधे बनविणारा कारखाना होता. तसेच जुनी नगरपालिका यामुळे अनेक कामगारांना भाडेतत्वावर राहण्याची हक्काची जागा म्हणजे बापटवाडा होता. म्हणूनच पनवेलमध्ये रहायला बापटवाडा आणि कामाला धुतपापेश्वर अशी म्हण देखील प्रचलित झाली होती. 

इंग्रजकालीन तहसिल कचेरी देखील बापटवाड्याला लागून होती. कुटूंबियांच्या चार वारसदारांपैकी दोन वारसदारांनी त्यांच्या वाट्याला आलेला बापटवाडा यापुर्वी विकसकांना विकून मोडीत काढला होता. उरलेल्या जागेत दोन वारसदार आणि भाडोत्र्यांमध्ये वाद सुरू होते. पुर्वीच्या अत्यंत नाममात्र भाडेतत्वावर अनेक वर्षांपासून दोन भाडोत्री इथे रहायला होते. वाड्याची देखभाल दुरूस्ती करण्यात मालकाची इच्छा नसल्यामुळे अनेक भाडोत्र्यांनी बोजाबिस्तारा गुंडाळून आपले बिर्हाड इतरत्र हलविले होते. अनेक वर्षांपासून भाडोत्री आणि मालक यांच्यातील वाद न्यायालयात होता. न्यायालयाने धोकादायक झालेला उरलासुरला वाडा पाडण्यास परवानगी दिल्यामुळे महापालिकेने वाडा पाडण्याची प्रक्रिया सुरू केली. कारवाईपुर्वी वाड्यात राहणाऱ्या दोन भाडोत्र्यांना नोटीस देखील दिली होती. वाडा पुर्णपणे रिकामा केल्यामुळे महानगरपालिकेने धोकादायक वाडा जमिनदोस्त केला.

दरम्यान, पनवेल मधील परंपरागत गोकूळकाला याच बापटवाड्यात दरवर्षी व्हायचा. जिकी वर्ष या वाड्याला झाली आहे, साधारण तितकीच वर्षे बापटवाड्यात सुरू झालेल्या आगळ्या वेगळ्या गोपालकाला उत्सवाला झाली. काही दिवसांपुर्वी  साजरा झालेला गोपालकाला उत्सव देखील वाड्यात साजरा झाला होता. आता हा उत्सव कुठे साजरा होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Maharashtra Weather Updates: चीनच्या 'डॉल्फिन'ने महाराष्ट्राचा पाऊस रोखला; आता पुन्हा मान्सूनचा जोर वाढणार, नेमकं काय घडलं?
चीनच्या 'डॉल्फिन'ने महाराष्ट्राचा पाऊस रोखला; आता पुन्हा मान्सूनचा जोर वाढणार, नेमकं काय घडलं?
पनवेलमध्ये ‘युवोत्कर्ष- The Youth Conclave’ उत्साहात संपन्न, युवकांचा मोठा सहभाग
पनवेलमध्ये ‘युवोत्कर्ष- The Youth Conclave’ उत्साहात संपन्न, युवकांचा मोठा सहभाग

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget