एक्स्प्लोर

Ashish Shelar On Amit Thackeray: अमित ठाकरेंनी अनावरण केलेला नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा पुन्हा कपड्याने झाकला; आशिष शेलार म्हणाले...

Ashish Shelar On Amit Thackeray: नवी मुंबईतील नेरूळ येथे महानगरपालिकेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावरुन मंत्री आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ashish Shelar On Amit Thackeray: नवी मुंबईतील नेरूळ येथे महानगरपालिकेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Navi Mumbai) गेल्या सहा महिन्यांपासून पालिकेने अनावरण केले नव्हते. खराब कपड्यांमध्ये बंदीस्त असलेल्या पुतळ्याचे रविवारी (16 नोव्हेंबर) मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी अचानक अनावरण केले. यावेळी पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुध्दा झाली होती. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात अमित ठाकरे आणि 70 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र आता अमित ठाकरेंनी अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला परत एकदा कपड्याने बंदीस्त करण्यात आले आहे. त्यामुळे मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar On Amit Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

आशिष शेलार यांना नवी मुंबईतील अमित ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण केल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर या प्रकरणाची माहिती संबंधित मंत्रालय देईल. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूर्ण काम झाल्यानंतर उद्घाटन तातडीनेच झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे, असं आशिष शेलार म्हणाले. 

अमित ठाकरे काय म्हणाले? (Amit Thackeray On Chhatrapati Shivaji Maharaj Statue)

माझ्या सहकाऱ्यांसह विधिवत आरती करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले गेले. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह सभोवतालच्या मंडपाला आज पुन्हा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवण्यात आलं आहे. एकच सांगतो, तो कपडा आम्ही पुन्हा काढून फेकू. कारण महाराजांच्या दर्शनाचा हक्क प्रत्येकाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही एका क्षणासाठीही सहन करणार नाही, असं अमित ठाकरे म्हणाले.  छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. त्यांच्या सन्मानासाठी जे काही सहन करावं लागेल, ते सगळं आम्ही आनंदाने सहन करू, असं अमित ठाकरेंनी सांगितले. माझ्या राजकीय आयुष्यातील पहिली केस ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आहे. याचा मला अभिमान आहे, असंही अमित ठाकरे म्हणाले. 

नेमकं प्रकरण काय? (Navi Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj Statue)

नवी मुंबईच्या नेरुळमध्ये राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतिक्षेत तसाच झाकून ठेवलेल्या अवस्थेत होता. अमित ठाकरेंना ही बाब समजताच त्यांनी परवानगी न घेता त्या पुतळ्याचं अनावरण केलं. याच प्रकरणात त्यांच्यावर आणि 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नवी मुंबईतील कौपरखैरणे येथे मनसे शाखेच्या उद्घाटनासाठी अमित ठाकरे आले होते. त्यावेळी त्यांना महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ मनसैनिकांच्या मदतीने पोलिसांच्या डोळ्यादेखत पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी मनसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं.

आशिष शेलार काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

Amit Thackeray On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Navi Mumbai: लोकापर्ण केले, पाण्याने धुवून आरतीही केली; पुन्हा नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा कपड्याने झाकला; अमित ठाकरे म्हणाले, एकच सांगतो...

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Embed widget